Reliance Jio IPO : मुकेश अंबानींची AGM मध्ये मोठी घोषणा! 2026 मध्ये येणार रिलायन्स जिओचा IPO
Jio News Update : कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी, 29 ऑगस्ट रोजी झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) ही मोठी घोषणा केली.

Jio IPO Announcement At RIL AGM 2025 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) 48व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली. बहुप्रतिक्षित जिओचा आयपीओ 2026 च्या पहिल्या सहामाहीत आणला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही घोषणा गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरणार असून, कंपनी सध्या आयपीओसाठी आवश्यक सर्व मंजुरींच्या प्रक्रियेत आहे.
मुकेश अंबानी म्हणाले, “जिओ IPO साठी पूर्णपणे सज्ज आहे. आमचे लक्ष्य 2026 च्या पहिल्या सहामाहीत शेअर बाजारात लिस्टिंग करण्याचे आहे. ही गुंतवणूकदारांसाठी एक मोठी संधी असेल.”
50 कोटी ग्राहकांचा टप्पा पार
या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याची माहिती देण्यात आली. जिओच्या ग्राहकसंख्येने 50 कोटींचा आकडा पार केला आहे. याबद्दल आभार मानताना मुकेश अंबानी म्हणाले, “जिओ ही फक्त एक कंपनी नाही, तर भारतीयांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनली आहे. जिओने लोकांच्या जगण्याला नवा अर्थ दिला आहे.”
🚨 Mukesh Ambani at RIL AGM 2025: Reliance Jio IPO expected in first half of 2026. pic.twitter.com/wYOedxSEfD
— Indian Trend 𝕏 (@IndianTrendX) August 29, 2025
जिओची ऐतिहासिक कामगिरी
अंबानी यांनी आठवण करून दिली की जिओने दूरसंचार क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल घडवले आहेत. मोफत व्हॉइस कॉल्स, डिजिटल पेमेंट्सला गती, आधार, यूपीआय आणि जनधनसारख्या प्लॅटफॉर्मना प्रोत्साहन, तसेच भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमला बळ देण्यामध्ये जिओने मोलाचा वाटा उचलला आहे.
5G सेवेत वाढ
जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी सांगितले की, जिओ 5G सेवेमुळे कंपनीच्या ग्राहकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या 22 कोटींपेक्षा जास्त लोक जिओ 5G नेटवर्कशी जोडले गेले आहेत. त्यांनी हेही स्पष्ट केले की लवकरच जिओ आंतरराष्ट्रीय बाजारातही आपले ऑपरेशन्स सुरू करणार आहे.

हे ही वाचा -
चांदी महाग होणार का? तीन दिवसांनी नवीन नियम लागू होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती