LIC IPO : लवकरच खुला होणार एलआयसीचा आयपीओ, विमाधारकांसह LIC कर्मचाऱ्यांना मिळणार खास सूट
LIC IPO : आगामी मार्च महिन्यात एलआयसीचा आयपीओ खुला होण्याची शक्यता आहे. आधीच ज्यांच्या नावे विमा पॉलिसी आहे, अशा ग्राहकांसाठी कंपनी एलआयसी इश्यू साईझच्या एक दशांश शेअर्स आरक्षित करण्याची योजना आखत आहे.
LIC IPO : लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) अर्थात एलआयसीचा आयपीओ लवकरच खुला होणार आहे. एलआयसीने त्यासाठी सेबीकडे प्रक्रिया सुरू केली आहे. केंद्र सरकारला 31 मार्च आधी एलआयसीचा आयपीओ बाजारात आणायचा आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार एलआयसीचा आयपीओ 10 मार्च 2022 रोजी खुला होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एलआयसीचा आयपीओ 10 मार्च रोजी खुला (LIC IPO Open Date) होणार आहे. 14 मार्चपर्यंत आयपीओसाठी अर्ज करता येईल. LIC चा इश्यू साइज हा 65 हजार कोटी रुपयांचा असू शकतो. रिटेल गुंतवणूकदारांमध्ये LIC IPO बाबत अधिक उत्साह दिसून येत आहे. चला तर जाणून घेऊया एलआयसीच्या या आयपीओबद्दल.
तेजी मंदीचे वैभव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीचा हा आयपीओ प्रमोटरद्वारे संपूर्ण ऑफर-फॉर-सेल असणार आहे. भारताचे राष्ट्रपती आणि भारत सरकारच्या वित्त मंत्रालयामार्फत काम करणारे लोक एलआयसीचे प्रमोटर आहेत. जवळपास 31.5 कोटी शेअर्स ऑफरवर असतील. सरकार एलआयसीमधील आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे. एलआयसीच्या आयपीओमधून मिळणारे उत्पन्न सरकारला आर्थिक वर्ष 2022 साठी 78 हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करेल.
एप्रिल ते सप्टेंबर 2021 या अर्धवर्षात एलआयसीचा निव्वळ नफा 1, 437 कोटीपर्यंत वाढला आहे. याबरोबरच या कालावधीत गुंतवणुकीतून येणारे उत्पन्न 12 टक्क्यांनी वाढून ते 1.49 लाख कोटी झाले आहे. या उत्पन्नात डिविडेंड, रेंट आणि इंटरेस्ट यांचा समावेश आहे. कंपनीचे निव्वळ प्रीमियम 1.84 लाख कोटींवरून 1.85 लाख कोटींवर पोहोचले असल्याची माहिती वैभव अग्रवाल यांनी दिली आहे.
एसलआयसीकडे स्टॉक होल्डिंगसह विमा व्यवसायाव्यतिरिक्त गुंतवणुकीचा मोठा मार्ग आहे. कंपनीकडे एम. एफ हुसैन यांच्यासह दिग्गज चित्रकारांच्या दुर्मिळ कलाकृतींचा मोठा संग्रह आहे. याबरोबरच एलआयसीची सर्वात मत्वाची ताकद म्हणजे त्यांचे नाव आज देशातील प्रत्येक घरात पोहोचले आहे. शिवाय ही सरकारी कंपनी असल्यामुळे गुंतवणुकदारांचा कंपनीवर विश्वास आहे. त्यामुळे नोकदार वर्ग आपल्या भविष्याचा विचार करून या कंपनीत मोठी गुंतवणूक करत असतात. आज घडीला बाजारात पॉलिसी देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून एलआयसीने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. त्यामुळे मार्केटमध्ये आजही एलआयसी आपले वर्चस्व राखून आहे.
विमा पॉलिसीधारकांसह कर्मचाऱ्यांना मिळणार सूट
दरम्यान, एलआयसीचा आयपीओ बाजारात आल्यानंतर विमा पॉलिसीधारकांना त्याचा फायदा होणार आहे. कारण आधीच ज्यांच्या नावे विमा पॉलिसी आहे, अशा ग्राहकांसाठी कंपनी एलआयसी इश्यू साईझच्या एक दशांश शेअर आरक्षित करण्याची योजना आखत आहे. या योजनेअंतर्गत एलआयसीचे कर्मचारी आणि पॉलिसीधारकांना इश्यू प्राईसवर सूट मिळणार आहे. ही सूट किती मिळणार याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिली नाही. परंतु, लवकरच ही सूट किती देण्यात येणार आहे? हे कंपनी जाहीर करणार आहे. ज्यांच्याकडे आधीच एलआयसीच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त जीवन विमा पॉलिसी आहेत, अशा ग्राहकांना आरक्षित शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे. त्यासाठी या ग्राहकांचे फक्त विमा पॉलिसी आणि डीमॅट खात्याशी जोडलेले पॅन कार्डचे तपशील लागणार असल्याची माहिती वैभव अग्रवाल यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
HDFC Bank : एचडीएफसीने बँकेने फिक्स डिपॉझिटवरचे व्याजदर वाढवले, बघा काय आहेत नवीन दर
PMJJBY : 12 कोटी लोकांनी घेतला केंद्राच्या योजनेतून फक्त 330 रुपायांत 2 लाखांचा विमा, तुम्हीही 'या' योजनेचा लाभ घेऊ शकता, जाणून घ्या