Adani Wilmar Listing Price: अदानी विल्मरचे शेअर झाले लिस्ट, जाणून घ्या गुंतवणुकदारांना फायदा झाला की निराशा
Adani Wilmar Listing Price : गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या अदानी विल्मरचे शेअर्स (Adani wilmar share) आज शेअर बाजारात लिस्ट झाले आहेत.
Adani Wilmar Listing Price : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या अदानी विल्मरचे शेअर्स (Adani wilmar share) आज शेअर बाजारात लिस्ट झाले आहेत. 230 रुपयांच्या पुढे अदानी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 221 रुपये प्रति शेअर या दराने लिस्ट करण्यात आले आहेत. तर अदानी विल्मरचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) वर 227 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत.
आज सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी अदानी विल्मरचे शेअर बीएसईवर 221 रूपये प्रति शेअरसह निश्चित झाले तर NSE वर 227 रूपये निश्चित झाले.
अदानी विल्मर कंपनीच्या आयपीओत प्रती शेअर 218-230 रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. अदानी विल्मरचा आयपीओ 27 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत अर्ज करण्यासाठी सुरू ठेवण्यात आला होता. अदानी विल्मर कंपनीकडून 3600 कोटींच्या समभागाची विक्री करण्यात येणार आहे.
किती लॉटसाठी करता येणार अर्ज?
गुंतवणुकदारांना कमीत-कमी 65 इक्विटी शेअर्सच्या एका लॉटसाठी अर्ज करता येणार होता. त्यासाठी गुंतवणुकदारांना 14 हजार 950 रूपये गुंतवावे लागणार होते. तर जास्तीत-जास्त 13 लॉटसाठी अर्ज करता येणार होता. त्यासाठी गुंतवणुकदारांना 1 लाख 94 हजार 350 रूपयांची गुंतवणूक करावी लागणार होती.
अदानी विल्मरच्या आयपीओची साईज 3 हजार 600 कोटी रूपये इतकी असून तो पूर्णपणे नवीन सुरू करण्यात आला आहे. कंपनी IPO मधून मिळणारी रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि व्यवसायाला चालना देण्यासाठी वापणार आहे. याबरोबरच कंपनी IPO मधून मिळणारे उत्पन्न भांडवली खर्चासाठी कर्ज कमी करण्यासाठी आणि अधिग्रहण करण्यासाठी वापरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Adani Wilmar IPO: अदानी समूहात गुंतवणूक करण्याची संधी, आजपासून Wilmar आयपीओ खुला
- Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला
- SBI MF Scheme : कमाईची उत्तम संधी! एसबीआयच्या नवीन म्युच्युअल फंडात SIP सह गुंतवणुकीची संधी
- म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'हा' नियम ठाऊक आहे का? 15 वर्षात होऊ शकता करोडपती