एक्स्प्लोर

पैसे ठेवा तयार! ह्यूंदाई मोटर्सचा आयपीओ 'या' तारखेला येण्याची शक्यता; दिवाळीपूर्वी पडणार पैशांचा पाऊस?

Hyundai Motors IPO : ह्युंदाई मोटर्स या दिग्गज कंपनीचा आयपीओ येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गुंतवणूकदार या आयपीओची वाट पाहात आहेत.

Hyundai Motor India IPO: आगामी दोन ते तीन महिन्यांत अनेक दिग्गज कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीच्या आयपीओचीही गेल्या अनेक दिवासांपासून चर्चा आहे. ही एक वाहननिर्मिती करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या आयपीओत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता या आयपीओची संभाव्य तारीख समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा आयपीओ येत्या 14 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होऊ शकतो. 

देशातला सर्वांत मोठा आयपीओ ठरणार

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड या कंपनीचा आयपीओ एकूण 25 हजार कोटी रुपयांचा असेल. भारतातला हा आतापर्यंतचा सुर्वांत मोठा आयपीओ असेल. याआधी भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ सर्वांत मोठा होता. या आयपीओचा आकार 21 हजार कोटी रुपये होता. मात्र आता ह्युंदाई या कंपनीचा आयपीओ एलआयसीपेक्षाही मोठा असणार आहे. 

14,21,94,700 शेअर्स विकले जाणार

ह्युंदाई या कंपनीने आयपीओच्या परवानगीसाठी जून महिन्यात भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला होता. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी या कंपनीच्या आयपीओला सेबीने मंजुरी दिली होती. या कंपनीकडून एकूण 14,21,94,700 शेअर्स विकले जाणार आहे. हे सर्व शेअर्स ऑफर फॉर सेल असतील. म्हणजेच या आयपीओत कोणताही नवा शेअर जारी केला जाणार नाही. 

25,000 कोटी रुपये उभे करणार 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्युंदाई ही कंपनी प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून एकूण तीन अब्ज अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण 25,000 कोटी रुपये उभे करणार आहे. ह्युंदाई मोटर या कंपनीने 1996 साली भारतात उत्पादन घ्यायला सुरुवात केली होती. याआधी 2003 साली मारुती सुझुकी नावाची वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनी आपला आयपीओ घेऊन आली होती. त्यानंतर आता दोन दशकांनंतर वाहननिर्मिती क्षेत्रातील कंपनीचा आयपीओ येत आहे. 

यावर्षी आयपीओंचे प्रमाण 29 टक्क्यांनी जास्त

दरम्यान, या वर्षी अनेक कंपन्यांनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी आयपीओ आणलेले आहेत. आतापर्यंत 62 कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 64 हजार कोटी रुपये उभे केले आहेत. 2023 साली एकूण 57 कंपन्यांचे आयपीओ आले होते. या कंपन्यांनी तेव्हा एकूण 49,436 कोटी रुपये उभे केले होते. या वर्षी आयपीओंचे हे प्रमाण 29 टक्क्यांनी जास्त आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

एका वर्षात होणार मालामाल! 'हे' पाच स्टॉक तुम्हाला देतील दमदार रिटर्न्स

युद्धजन्य स्थितीत कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करावी? 'हे' आहेत सर्वोत्तम 11 शेअर्स!

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget