आतापर्यंचा सर्वांत मोठा आयपीओ आला, पण GMP वर थेट 2 टक्क्यांची घसरण; ह्यंदाईच्या आयपीओत गुंतवणूक करावी की नाही?
Hyundai IPO : आजपासून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या जीएमपीमध्ये या कंपनीच्या शेअरचे मूल्य घसरत आहे.
मुंबई : ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ (Hyundai Motor IPO) गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. हा आयपीओ आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ ठरला आहे. 17 ऑक्टोबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. ह्युंदाई मोटर इंडिया ही कंपनी या आयपीओतून 27,870 कोटी रुपये उभे करणार आहे. साधारण दोन दशकांनंतर ऑटो सेक्टरमधील आयपीओ आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा आयपीओ गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देणार, असे सांगितले जात होते. मात्र ग्रे मार्केटमध्ये हा आयपीओचा प्रिमियम चांगलाच पडला आहे. आज गुंतवुकीसाठी खुला झाल्यानंतर हा आयपीओ 2 टक्क्यांनी घसरला आहे.
ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार हिस्सेदारी
ह्युंदाई मोटर इंडियाचा हा आयपीओ 15 ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. आज दुपारपर्यंत हा आयपीओ 8 टक्क्यांनी सबस्क्राईब झाला आहे. या आयपीओत कोणत्याही नव्या शेअरची विक्री होणार आहे. या कंपनीतील गुंतवणूकदार ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून आपली हिस्सेदारी विकणार आहेत. या आयपीओतून उभ्या राहिलेल्या पैशांतून कंपनी संशोधन करणार आहे. हा पैसे विकास, नव्या संकल्पना राबवण्यावर खर्च केला जाणार आहे.
जीएमपी मध्ये मोठी घसरण
आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्याआधी या कंपनीचे शेअर ग्रे मार्केटमध्ये 35-40 रुपयांवर होते. गुंतवणुकीसाठी खुला झाल्यानंतरदेखील या कंपनीच्या शेअरमध्ये घसरण झाली. सध्या जीपीएममध्ये या कंपनीच्या शेअरचा प्रिमियम 45 रुपये आहे. काही दिवसांपूर्वी जीपीएमवर या कंपनीच्या शेअरचे मूल्य साधारण 570 रुपये होते. मात्र या शेअरच्या मूल्यात साधारण 89 टक्के घसरण झाली आहे. या कंपनीने आपल्या आयपीओसाठी 1,865-1,960 रुपयांचा किंमत पट्टा जाही केला आहे.
IPO च्या माध्यमातून ह्युंदाई कंपनी आली 17.5 टक्के हिस्सेदारी विकणार आहे. या आयपीओतून 142.2 दशलक्ष शेअर्स विकले जाणार आहेत. या शेअर्सचे मूल्य 12 अब्ज डॉलर्स आहे. या कंपनीचे मूल्य साधारण 19 अब्ज डॉलर्स आहे.
कमीत कमी 13,720 रुपयांची करावी लागणार गुंतवणूक
ह्युंदाई मोटर इंडिया या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आयपीओच्या गुंतवणुकीत प्रत्येक शेअरमध्ये 186 रुपयांची सूट दिली आहे. या कंपनीन प्रत्येक लॉटमध्ये एकूण सात शेअर्स ठेवले आहेत. म्हणजेच प्रत्येक गुंतवणूकदाराला एका लॉटसाठी कमीत कमी 13,720 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. दरम्यान, या जीएमपीमध्ये शेअरचे मूल्य घसरल्यामुळे गुंतवणूक करावी की नाही, असा प्रश्न गुंतवणूकदारांपुढे उभा ठाकला आहे. दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची तयारी असेल तर या आयपीओत गुंतवणूक करता येईल, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळवण्याची आजची शेवटची संधी, 15 ऑक्टोबरनंतर अर्ज होणार बंद!
मोठी बातमी! मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीची करण जोहरशी हातमिळवणी; कोट्यवधीचा करार होणार?