CIDCO House Lottery 2024 : सिडकोच्या घरांसाठी 75 हजारांची अनामत रक्कम, 5 पसंतीची मर्यादा; लॉटरीत भाग घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?
CIDCO House Lottery : राज्य सरकारने सिडकोच्या घरांची लॉटरी चालू केली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 26 हजार घरांसाठी सोडत निघाली आह.
मुंबई : म्हाडानंतर आता सिडकोच्या घरांची लॉटरी (CIDCO House Lottery 2024) निघाली आहे. सिडकोतील ही घरे नवी मुंबई भागात आहेत. वाशी, तळोजा, खारघर, तळोजा, कळंबोली, कामोठे, पनवेल, उलवे या भागात ही घरे असणार आहेत. या घरांची सोडत संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. तसेच या सोडतीत भाग घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल. हा अर्ज करण्यासाठी तुमच्याजवळ काही कागदपत्रे असणे गरजेचे आहे. तसेच तुम्हाला वेगवेगळ्या गटातील घरांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला भरावी लागणारी अनामत रक्कमही वेगवेगळी असणार आहे.
प्रत्येक फेरीत पाच पसंतींची मर्यादा
नवी मुंबई भागात सिडकोच्या घरांसाठी अर्ज करण्यासाठी पसंतीची निवड आणि बुकिंग रकमेची विंडो 15 दिवसांसाठी खुली असेल. ज्या ग्राहकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे, त्यांना त्यांच्या पसंती निवडण्यासाठी सूचित केले जाईल. ग्राहक एकूण 15 पसंती निवडू शकतो. अर्जदार सोडतीच्या तीन फेऱ्यांध्ये भाग घेऊ शकतात. प्रत्येक फेरीत ग्राहक त्याच्या किमान एक व कमाल पाच निवडी देऊ शकतो. निवडलेल्या प्रत्येक प्रकल्प स्थळावरील टॉवर व मजल्यांचे जास्तीत जास्त 5 पसंती निवडू शकतो. कुठल्याही सोडत फेरीमध्ये प्रकल्प स्थळाबाबत कोणतीही मर्यादा नाही. परंतु प्रत्येक फेरीत एकूण 5 पसंतीची मर्यादा आहे. पसंती दिल्यानंतर, अर्जदारांना बुकिंग रक्कम भरावी लागेल.
ही बुकिंग रक्कम आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी (EWS) 75,000/- + GST असेल. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) 1,50,000 रुपये + GST - 1 BHK घराच्या पसंतीसाठी), 2,00,000 + GST रुपये दोन बीएचके बुंकिग रक्कम असेल. बुकिंग रक्कमेची विंडो बंद झाल्यानंतर पात्र ग्राहकांची मसुदा यादी प्रसिद्ध केली जाईल. ज्या ग्राहकांची नावे मसुदा यादीत नाहीत ते त्यांच्या हरकती यादी प्रकाशित झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत नोंदवू शकतात.
अपयशी ग्राहकांना 30 दिवसांच्या आत रक्कम परत मिळणार
हरकतींचे निराकरण हे हरकती नोंदवण्याच्या तारखेनंतरच्या 7 दिवसांत केले जाईल. सर्व हरकतींचे निराकरण केल्यानंतर 5 दिवसांनी पात्र ग्राहकांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. सोडतीच्या तारखा नंतर जाहीर होतील. सोडतीची अंमलबजावणी झाल्यावर यशस्वी अर्जदारांची यादी सिडको संकेतस्थळावर प्रदर्शित केली जाईल आणि यशस्वी विजेत्यांना इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेंट) जारी केले जाईल. लॉटरी प्रक्रियेत अपयशी ठरलेल्या ग्राहकांना बुकिंगची रक्कम 30 दिवसांच्या आत परत केली जाईल. विजेत्यांना इरादा पत्रात दिलेल्या वेळापत्रकानुसार उर्वरित बुकिंग रक्कम भरण्यासाठी सूचित केले जाईल. सर्व विजेत्यांची कागदपत्रे डिजिटल पद्धतीनेच तपासली जातील आणि यशस्वीरीत्या पडताळणी झालेल्या अर्जदारांना नोंदणी पोर्टलवर हप्त्यांच्या वेळापत्रकासह वाटप पत्र दिले जाईल. हप्ते यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर कराराची प्रक्रिया सुरु केली जाईल. करार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घराच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरु केली जाईल. हस्तांतरणाच्या दिवशी घरमालकांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द केली जाईल.
अर्जासाठी कोणते कागदपत्र लागणार?
>>> अर्जदाराचे आधार कार्ड व आधारशी लिंक असलणारा मोवाईल क्रमांक
>>> अर्जदाराचे पॅन कार्ड
>>> रहिवास प्रमाणपत्र (माजी सैनिकांना सूट) (महाराष्ट्रातील कोणत्याही भागात किमान 15 वर्षचि वास्तव्य)
>>> ई-मेल आयडी
>>> अलिकडील छायाचित्र उत्पन्नाचा पुरावा-
>>> कुटुंबातील सर्व सदस्यांचे आर्थिक वर्ष 2023-2024 चे आयकर रिटर्न (ITR) तपशीलात्मक असावेत. (आयकर रिटर्नचे एकच पान विचारात घेतले जाणार नाही.)
>>> तहसीलदाराने दिलेले मागील तीन आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
>>> नियोक्त्याने (Employer) दिलेल्या 12 महिन्यांच्या वेतन पावत्या, ज्यांवर TAN आणि PAN नमूद असावेत.
>>> TAN आणि PAN नमूद असलेल्या लेटरहेडवरील उत्पन्न प्रमाणपत्र
>>> सह-अर्जदाराचे आधार कार्ड (लागू असल्यास)
>>> सह-अर्जदाराचे पॅन कार्ड (लागू असल्यास)
हेही वाचा :