ॲपलचा iphone 16 लवकरच बाजारात, लाँचिंग किंमत लीक; AI फिचर्सचं अपडेट व्हर्जन
Iphone 16 series: आयफोनच्या नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत असतात. गतवर्षी आयफोन 15 ची सीरीजी लाँच झाल्यानंतर त्याच्या खरेदीसाठीही स्मार्टफोन ग्राहकांची झुंबड उडाली होती
मुंबई : सध्या प्रत्येकाला स्टँडर्ड लाईफ जगायची, हौस आणि मजामौज करायची सवय लागली आहे. वागण्यापेक्षा पेहरावात आणि दिखावात ब्रँड जपायची जणू स्पर्धाच लागली आहे. त्यामुळे, ब्रँडेड वस्तूचं लोन आता गावखेड्यातही पसरलं आहे. मग, अंगावरील कपड्यांपासून ते पायातील शूजपर्यंत आणि हातातील घड्याळांपासून ते खिशातील मोबाईलपर्यंत प्रत्येक वस्तू ब्रँडेड आणि त्यात टॉप ब्रँडची घेण्यात येत असल्याचं दिसून येतं. त्यातूनच, भारतात आयफोन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे, विशेष म्हणजे मासिक पगारापेक्षाही अधिक किंमतीचा आयफोन घेऊन आपलं स्टेटस जपण्याचं काम डिजिटल युगातील पिढी करताना दिसून येत आहे. त्यामुळे, आयफोनची मार्केटमध्ये चलती आहे. आता, अॅप्पलकडून आयफोन 16 सीरीज पुढील महिन्यात लाँच करण्यात येत आहे. अॅप्पलच्या या 16 सीरीजमधील सर्वच मॉडेलची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. त्यामुळे, ग्राहकांना अगोदरच पैशांची जुळवाजुळव करणं शक्य होणार आहे.
आयफोनच्या (iphone) नवीन सीरीजची ग्राहक आतुरतेनं वाट पाहत असतात. गतवर्षी आयफोन 15 ची सीरीजी लाँच झाल्यानंतर त्याच्या खरेदीसाठीही स्मार्टफोन (Smartphone) ग्राहकांची झुंबड उडाली होती. आता, आयफोन 16 सीरीजची वाट ग्राहकांकडून पाहिली जात आहे. काही दिवसांपूर्वी iPhone 16 आणि iPhone 16 Pro चा डमी लीक झाला होता. त्यामुळे, या फोनचे डिजाइन ओपन झाले, विशेष म्हणजे अॅप्पलची ही नवी आयफोन सीरीज (Apple) AI फीचर्ससह ग्राहकांना मिळणार आहे. या सीरीजचे सर्वच मॉडेल मेड इन इंडिया असण्याचीही शक्यता आहे. आयफोन 16 सीरीजचे 10 सप्टेंबर रोजी लाँचिंग होत आहे.
आयफोन 16 ची किंमत किती?
अमेरिकेत आयफोन 16 ची लाँचिंग प्राईज 799 डॉलर एवढी असू शकते. तर, भारतात आयफोन 16 79,900 रुपयांच्या प्राईजने लाँच होऊ शकतो. तसेच आयफोन 16 Plus ची ग्लोबल किंमत 899 डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे, भारतात या फोनची किंमत 89,900 रुपये असू शकते. आयफोनच्या प्रो मॉडेल्सचा विचार केल्यास आयफोन 16 Pro ची लाँचिंग प्राईज 1099 डॉलर एवढी असू शकते. तर, भारतात या फोनची किंमत 1,34,900 रुपये एवढी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सीरीजमधील सर्वात प्रीमीयम मॉडेल म्हणजे आयफोन 16 Pro Max असून त्याची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये 1,999 डॉलर असू शकते. तर, भारतातील या फोनची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये असण्याची शक्यता आहे.
आयफोन 16 सीरीजच फीचर्स
या वर्षी लॉन्च होत असलेल्या अॅप्पल च्या iPhone 16 सीरीज मध्ये iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम आहे. तसेच, Apple Intelligence चे इंटिग्रेशन भी पाहायला मिळेल. विशेष म्हणजे iPhone 16 सीरीजच्या डिजाइनमध्येही कंपनीकडून नव्याने अपग्रेड केलं जाऊ शकतं. iPhone 16 आणि iPhone 16 Plus चा लूक व डिजाइन एकसारखाच असू शकतो. तर, या सीरीजमधील iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max चे डिझाइन गतवर्षी लाँच झालेल्या मॉडेलसारखेच असण्याची शक्यता आहे.
डिस्प्लेची साईज किती?
16 सीरीजमधील आयफोनचा डिस्प्ले iPhone 15 च्या तुलनेत मोठा असेल. iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये अनुक्रम 6.1 इंच आणि 6.7 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तर, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये अनुक्रम 6.3 इंच आणि 6.9 इंच डिस्प्ले मिळू शकतो. दरम्यान, आयफोन 15 च्या सीरीजप्रमाणेच या 16 सीरीजमध्येही डायनॅमिक आयलँड फीचर्सचा वापर केला जाऊ शकतो.
हेही वाचा
Sanjay Raut: ... तर सुप्रीम कोर्टाला टाळं ठोकलं पाहिजे; अंधा कानून म्हणत संजय राऊतांचा संताप