करोडपती व्हायचंय? 10 लाखांची गुंतवणूक करा, 1 कोटी 5 लाख मिळवा, नेमकी काय आहे योजना?
Investment Plan : आज आपण कमी गुंतवणुकीत तुम्ही करोडपती कसे होऊ शकता? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
Investment Plan : अलीकडच्या काळात गुंतवणुकीचं (Investment) महत्व वाढलं आहे. आत्तापासूनच गुंतवणूक करणं हे भविष्यात फायद्याचे ठरते. तुम्हाला जर करोडपती व्हायचं असेल तर आत्तापासूनच थोडी थोडी गुंतवणूक करावी. तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळवून देणाऱ्या अनेक योजना (Yojana) आहेत. या योजनांच्या माध्यमातून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. आज आपण कमी गुंतवणुकीत तुम्ही करोडपती कसे होऊ शकता? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
जर तुम्ही गुंतवणुकीत सातत्य ठेवलं तर तुम्हाला करोडती होणं अवघड नाही. तुम्ही काही वर्षातच करोडपती होऊ शकता. फक्त यासाठी तुम्हाला स्मार्ट गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही जर 10,80,000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 1 कोटी 5 लाख 89 हजार 741 रुपयांचा परतावा मिळतो. म्हणजे 10 लाखांची गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता.
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय
आजच्या काळात म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. या माध्यमातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेत तुम्हाला सरासरी 12 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो. त्यामुळं हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. कारण इतर कोणत्याही योजनांपेक्षा 12 टक्के परतावा हा मोठा आहे. दरम्यान, ग्राहक या योजनेद्वारे मोठा पैसा मिळवू शकतात. यामध्ये तुम्हाला चक्रवाढीचा फायदा आहे. तसेच रुपयाच्या सरासरी खर्चामुळे, जोखीम देखील कमी होते. तुम्हाला जर या योजनेत गुंतवणूक करुन करोडपती व्हायचं असेल तर दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवावी लागेल. दरमहा थोडीशी बचत करूनही तुम्ही स्वतःला सहजपणे करोडपती बनवू शकता.
कशी कराल गुंतवणूक?
तुम्ही जर दररोज 100 रुपयांची बचत केली तर तुम्ही सहज करोडपती होऊ शकता. तुम्हाला वाढत्या वयात पैशांची अडचण येणार नाही. तुम्ही जर दररोज 100 रुपयांची बचत केली तर एक महिन्यात तुमची 3000 रुपयांची बचत होते. ही रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवावी. ही गुंतवणूक जर तुम्ही सतत 30 वर्ष ठेवली तर तुम्ही करोडपती व्हाल. SIP च्या सुत्रानुसार 30 वर्षांत तुम्ही एकूण 10,80,000 रुपये गुंतवाल. यावर जर तुम्हाला 12 टक्के व्याजदर मिळाला तर तुम्हाला एकूण 95,09,741 रुपये मिळतील. अशा स्थितीत 30 वर्षानंतर तुम्हाला 1,05,89,741 रुपये मिळतील. समजा तुम्हाला जर परतावा 12 टक्केएवजी 15 टक्के मिळाला तर 2,10,29,462 रुपये मिळतील.
महिन्याला 15,000 रुपये कमावत असाल तरी तुम्ही करोडपती होऊ शकता
दरम्यान, तुम्ही जर महिन्याला 15,000 रुपये कमावत असाल तरीदेखील महिना तुम्ही 3000 रुपयांची बचत करु शकता. नियमाप्रमाणे तुमच्या एकूण मिळकतीपैकी 20 टक्के बचत करणे गरजेचे असते. त्यामुळं 15000 रुपये मिळकत असेल तरीदेखील तुम्हाला 3000 रुपयांची गुंतवणूक करणं शक्य आहे. त्यामुळं वरच्या सुत्राप्रमाणं गुंतवणूक करुन तुम्ही करोडपती होऊ शकता.
महत्वाच्या बातम्या: