महागाईचा भडका! वर्षभरात बटाटा, कांदा, टोमॅटोच्या दरात किती झाली वाढ? सविस्तर माहिती एका क्लिकवर
गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या (potatoes-onion-tomato Price) दरात 81 टक्क्यांची वाढ झालीय. यामुळे व्हेज थाळीच्या किंमतीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
Inflation increased News : गेल्या वर्षभरात महागाई (Inflation) वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक वस्तूंच्या दरात वाढ झालीय. महागाई दर हा 5 टक्क्यांपर्यंत गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, अन्नधान्याच्या महागाईत (Foodgrain inflation) कोणतीही घट झालेली नाही. गेल्या वर्षभरात बटाटे, कांदे आणि टोमॅटोच्या (potatoes-onion-tomato Price) दरात 81 टक्क्यांची वाढ झालीय. यामुळे व्हेज थाळीच्या किंमतीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसात कांद्याच्या घाऊक भावात 50 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरील आकडेवारीवर नजर टाकली तर, गेल्या वर्षभरात बटाटे, कांदा आणि टोमॅटोच्या किमतीत 81 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. देशभरात या तिन्ही भाज्यांच्या सरासरी दरात कमालीची वाढ झालीय.
कोणत्या पिकाच्या दरात किती झाली वाढ?
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 30 एप्रिल 2023 रोजी बटाट्याची सरासरी किंमत 18.88 रुपये प्रति किलो होती. जी 10 जून 2024 पर्यंत 30.57 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच बटाट्याच्या दरात किलोमागे 11.69 रुपयांची वाढ झाली आहे. याचाच अर्थ गेल्या वर्षभरात बटाट्याचे भाव 62 टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या वर्षभरात कांद्याच्या भावात 13.50 रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दराने सर्वसामान्यांना रडवले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 30 एप्रिल 2023 रोजी कांद्याची सरासरी किंमत 20.41 रुपये प्रति किलो होती. जे 10 जून रोजी 33.98 रुपये झाले आहेत. याचाच अर्थ गेल्या एका वर्षात कांद्याच्या भावात 66 टक्के म्हणजेच 13.57 रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.
वर्षभरात टोमॅटोच्या किंमतीत मोठी वाढ
गेल्या वर्षभरात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किमतीत वर्षभरात 60 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बटाटे आणि कांद्याच्या तुलनेत टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झाली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 30 एप्रिल 2023 रोजी टोमॅटोची किरकोळ किंमत 20.55 रुपये प्रति किलो होती. 10 जून 2024 रोजी या टोमॅटोची किंमत 37.11 रुपयांपर्यंत गेली आहे. याचा अर्थ टोमॅटोच्या किमतीत गेल्या वर्षभरात 81 टक्के म्हणजेच 16.56 रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर किंमतीत मोठी वाढ
दरम्यान, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तर या पिकांच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. 30 रुपये किलोन विकला जाणारा बटाटा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर 41 रुपये किलो दरानं विकला जातोय. कांदा 43 ते 47 रुपयाने विकला जातोय. दरम्यान, या वस्तूंच्या महागाईमुळं व्हेज थाळी देखील महाग झालीय.
महत्वाच्या बातम्या: