सलग 6 दिवस विक्रमी पातळीनंतर भारतीय शेअर बाजारात आज घसरण, जाणून घ्या अपडेट्स
Stock Market Opening: आज 175 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 63,110 अंकांवर उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 48 अंकांच्या घसरणीसह 18,764 अंकांवर उघडला.
Stock Market Opening On 2nd Decemeber 2022: सलग सहा दिवस विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी घसरणीसह उघडला. आशियाई शेअर बाजारातील (Asian Stock Market) घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण पाहायला मिळाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा (Mumbai Share Market) निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 175 अंकांच्या घसरणीसह 63,110 अंकांवर उघडला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (Nifty) 48 अंकांच्या घसरणीसह 18,764 अंकांवर उघडला. घसरणीसह उघडल्यानंतर बाजार आणखी घसरला आणि सेन्सेक्स 63,000 अंकांच्या खाली घसरला. सध्या सेन्सेक्स 293 आणि निफ्टी 88 अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.
सेक्टरमधील परिस्थिती काय?
बाजारातील आजच्या व्यापार सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, इन्फ्रा यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. तर मेटल्स, एनर्जी यांसारख्या क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये तेजी आहे. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 13 शेअर्स वाढीसह आणि 37 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 7 शेअर्स वाढीसह तर 23 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. निफ्टी बँकमध्येही आज घसरण पाहायला मिळत आहे. निफ्टी बँकेच्या 12 बँकिंग शेअर्समध्ये, 6 शेअर्स वाढीसह आणि 6 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.
कोणते शेअर्स तेजीत?
ओएनजीसी 2.07 टक्के, हिंदाल्को 0.92 टक्के, बीपीसीएल 0.72 टक्के, टेक महिंद्रा 0.06 टक्के, रिलायन्स 0.49 टक्के, इंडसइंड बँक 0.43 टक्के, टाटा मोटर्स 0.27 टक्के, आय टीसी 0.27 टक्के, सह. 0.09 टक्के आणि टाटा स्टील 0.09 टक्क्यांसह हे शेअर्स तेजीत आहेत.
कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
घसरलेल्या शेअर्सवर नजर टाकल्यास, आयशर मोटर्स 2.10 टक्के, डिव्हिस लॅब 1.64 टक्के, एचयूएल 1.63 टक्के, बजाज ऑटो 1.46 टक्के, मारुती सुझुकी 1.45 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.43 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.34 टक्के, 1.34 टक्क्यांची घसरण झाली आहे.
गुरुवारची परिस्थिती काय?
सलग सहाव्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. गुरुवारी सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीने (Nifty) ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजारात काल दिवसभर तेजी दिसून आली तरी नफावसुलीमुळे काही प्रमाणात ब्रेक लागला. बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 184 अंकांच्या तेजीसह 63,284 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या तेजीसह 18,812 अंकांवर स्थिरावला.
बाजारातील व्यवहार थांबला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 17 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली होती. तर, 13 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. निफ्टी 50 निर्देशांकातील 23 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, 27 कंपन्यांचे शेअर दर घसरले. बँक निफ्टीनेदेखील उच्चांक गाठल्यानंतर नफावसुली दिसून आली. बँक निफ्टी निर्देशांकाने आज 43,515.05 अंकांचा उच्चांक गाठला. बाजार बंद झाला तेव्हा बँक निफ्टी निर्देशांक 29.65 अंकांच्या तेजीसह 43,260.65 अंकांवर स्थिरावला.