Stock Market Closing: घसरणीसह शेअर मार्केटचा 2022 ला निरोप, अडाणी ग्रुप राहिला वर्षभरातील स्टार परफॉर्मर
Share Market Update: वर्षाच्या शेवटाला सेन्सेक्स 293 अंकांनी निर्देशांक घसरत 60 हजार 841 वर बंद झाला तर निफ्टी निर्देशांक 86 अंकांनी घसरत 18 हजार 105 अंकांवर स्थिरावला.
Stock Market Closing On 30th December 2022: शेअर मार्केटनं घसरणीसह 2022 ला निरोप दिला आहे. या वर्षातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळाली होती. मात्र, बाजार बंद होताना शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. बीएसई सन्सेक्स 293 अंकांनी घसरला. बीएसई सन्सेक्स 60 हजार 841 अंकांवर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 86 अंकानी घसरुन 18 हजार 105 अंकावर बंद झाला. दरम्यान, यंदाच्या वर्षात अडाणी ग्रुप स्टार शेअर मार्केटमध्ये परफॉर्मर राहिला आहे.
वर्षाच्या अखेरच्या ट्रेडिंग सत्रामध्ये मेटल्स, रियल एस्टेट, मीडिया आणि पीएसयू बँकेचे शेअर्समध्ये उसळण पाहायाल मिळाली. पण बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी , एनर्जी सेक्टर यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. पण स्मॉल कॅप आणि मिडकॅप सेक्टरच्या शेअर्सने उसळी घेतली. सन्सेक्सच्या 30 शेअरमधील 10 शेअर्स उसळीसह बंद झाले. तर 20 शेअर्सच्या किंमती घसरणीसह बंद झाल्या. तर निफ्टीच्या 50 शेअर्समध्ये 17 शेअर्स उसळीनंतर बंद झाले तर 33 शेअर्स घसरणीनंतर बंद झाले.
वर्षाच्या शेवटाला सेन्सेक्स 293 अंकांनी निर्देशांक घसरत 60 हजार 841 वर बंद झाला तर निफ्टी निर्देशांक 86 अंकांनी घसरत 18 हजार 105 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बॅंक निर्देशांक 266 अंकांनी घसरत 42 हजार 986 वर बंद झाला. 2022 सालात सेन्सेक्स आणि निफ्टी प्रत्येकी पाच टक्क्यांनी चढले तर निफ्टी बँक 22 टक्के आणि मिडकॅप निर्देशांक चार टक्क्यांनी वधारला. पीएसयू बँक निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे, या वर्षी 70 टक्क्यांनी निर्देशांकात वृद्धी झाली. 2022 मध्ये निफ्टी आयटी 25 टक्क्यांहून अधिक घसरला, 2008 नंतरची सर्वात मोठी वार्षिक घसरण झाली. 2016 नंतर पहिल्यांदाच निफ्टी आयटीमधून निगेटिव्ह रिटर्न मिळाले आहेत. बीएसई कंपन्यांनी 2022 सालात 18 लाख कोटींचे मार्केट कॅप मिळवले. आयसीआयसीआय बॅंक, झोमॅटो, आयशर मोटर्स, एचडीएफसी, भारती एअरटेलसारख्या कंपन्यांचे समभाग कोसळले. डॉलरच्या तुलनेत रुपया 82.72 वर बंद, 12 पैशांनी रुपया मजबूत झालाय.
इंडेक्सचं नाव | कुठे बंद झालं? | उच्च स्तर | निम्न स्तर |
किती टक्के बदल |
BSE Sensex | 60,861.97 | 61,392.68 | 60,743.71 | -0.44% |
BSE SmallCap | 28,940.11 | 29,073.83 | 28,843.49 | 0.0081 |
India VIX | 14.8675 | 15.115 | 14.2825 | 0.0037 |
NIFTY Midcap 100 | 31,509.10 | 31,679.45 | 31,454.85 | 0.005 |
NIFTY Smallcap 100 | 9,731.30 | 9,792.80 | 9,710.40 | 0.0075 |
NIfty smallcap 50 | 4,341.95 | 4,369.80 | 4,333.95 | 0.0082 |
Nifty 100 | 18,258.75 | 18,434.20 | 18,232.30 | -0.46% |
Nifty 200 | 9,554.45 | 9,640.95 | 9,540.65 | -0.34% |
Nifty 50 | 18,105.30 | 18,265.25 | 18,080.30 | -0.47% |