एक्स्प्लोर

Savings Decline In India : भारतीय कुटुंबीयांची बचत घटली; घर आणि वाहनांसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले

Family Savings Decline In India :  भारतीय कुटुंबांची बचत सातत्याने कमी होत आहे. पण, त्यांच्या मालकीची घरे आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

Family Savings Decline In India :  भारताला बचतीचा देश म्हटले जाते. बचत करण्याच्या या सवयीमुळे भारताला 2008 च्या जागतिक आर्थिक मंदीसारख्या अरिष्टाला सामोरे जाण्यास मदत झाली. मात्र, आता काहीशी चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतीय कुटुंबांची बचत सातत्याने कमी होत आहे. पण, त्यांच्या मालकीची घरे आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र, अर्थतज्ज्ञांच्या मते, भारतीय कुटुंबांची कर्ज परतफेड करण्याची क्षमता अजूनही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा जास्त आहे.

भारतीय कुटुंबांच्या निव्वळ बचतीचा आकडा 4 टक्क्यांनी घटला

अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या दोन वर्षांत भारतीय कुटुंबांच्या निव्वळ बचतीचा आकडा सुमारे 4 टक्क्यांनी घसरला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात तो GDP च्या 5.1 टक्के राहिला आहे. तर 2020-21 मध्ये हाच आकडा 11.5 टक्के होता. सध्या ते 7 ते 7.5 टक्क्यांच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा खूपच खाली गेले आहे. भारतातील लोक आता रिअल इस्टेट आणि वाहने खरेदीवर जास्त पैसे खर्च करत आहेत. त्यामुळे त्यांचे कर्ज वाढले आहे. तरीही भारतीयांची कर्ज फेडण्याची क्षमता जगातील मोठ्या देशांपेक्षा आजही जास्त आहे.

बचत मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी बचतीचा वापर

बचतीमधील रक्कम घटत असल्याने भारतीय कुटुंबे कठीण काळात अडचणीत येऊ शकतात. मात्र, तरीहीदेखील कर्ज घेण्याकडे कल वाढत आहे. त्यांची आर्थिक दायित्वे 2022-23 या आर्थिक वर्षात GDP च्या 5.8 टक्क्यांवर पोहोचली आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात हा आकडा 3.8 टक्के होता. मात्र, रिझव्‍‌र्ह बँकेच्या नुकत्याच झालेल्या विश्‍लेषणानुसार बचतीतील घसरणीचा आकडा सध्या स्थिर आहे. याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. भारतीय कुटुंबे मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी त्यांच्या बचतीचा वापर करत आहेत.

भारताचे Debt-Service गुणोत्तर मार्चमध्ये 6.7 टक्के

अहवालानुसार, मार्च 2023 मध्ये भारताचे Debt-Service Ratio हे 6.7 टक्के होते. हाच आकडा अमेरिकेत 7.8 टक्के, जपानमध्ये 7.5 टक्के, ब्रिटनमध्ये 8.5 टक्के, कॅनडामध्ये 14.3 टक्के आणि कोरियामध्ये 14.1 टक्के होता. या बाबतीत भारताची स्थिती जगातील अनेक देशांपेक्षा चांगली आहे.

Debt-Service गुणोत्तर म्हणजे कर्जदाराकडे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा निधी, पैसे आहेत का हे या गुणोत्तरावरून समजते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget