एक्स्प्लोर

Indian Economy: भारत जपानला टाकणार मागे? लवकरच होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था 

सध्या भारत हा जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. पण लवकरच भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे.

Indian Economy: भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या दशकात अनेक मोठे टप्पे गाठले आहेत. सध्या भारत हा जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणारा देश बनला आहे. भारत हे जागतिक अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र मानले जात आहे. दरम्यान, अलीकडेच S&P ग्लोबल मार्केटने केलेल्या दाव्यानुसार, अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत लवकरच जपानला मागे टाकेल. 2030 पर्यंत भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. 

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, S&P ग्लोबल मार्केटने अंदाज लावला आहे की 2030 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था 7.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. त्यानंतर भारत जपानला मागे टाकून आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. S&P ग्लोबल मार्केटने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 2021 आणि 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग खूप मजबूत होता. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) आर्थिक वर्ष 2024 पर्यंत 6.2 टक्के ते 6.3 टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत जागतिक स्तरावर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत येतो. त्याच वेळी, एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.8 टक्के होता. गेल्या काही वर्षांत देशात परदेशी गुंतवणूक वाढली आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहे.

भारत जर्मनीलाही टाकणार मागे 

या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, जपान व्यतिरिक्त भारत 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकेल. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल. या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेतील तेजीसाठी वाढत्या देशांतर्गत मागणीला जबाबदार धरण्यात आले आहे.

अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश

अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा 25.5 ट्रिलियन डॉलर आहे. तर 18 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जपानचा 4.2 ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. दरम्यान, S&P ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त, इतर अनेक जागतिक संस्थांनी देखील असे दावे केले आहेत. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल. 

महत्त्वाच्या बातम्या:

India Economy: HDFC च्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य, 2050 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था एवढ्या पटीनं वाढणार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget