एक्स्प्लोर

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळं दारु पिणाऱ्यांसाठी गुड न्यूज, कापड-पादत्राणं स्वस्त होणार, FTA चा कशावर परिणाम होणार?

India UK Free Trade Agreement : भारत आणि ब्रिटन यांच्यात आज ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला आहे. यामुळं दोन्ही देशांमधील गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार झाल आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी चेकर्स हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं. या दरम्यान, भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि ब्रिटनचे वाणिज्य मंत्री जोनाथन रेनॉल्डस यांनी  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

भारत आणि ब्रिटन यांच्यातील या करारामुळं दोन्ही देशांमध्ये व्यापारासंदर्भतील नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे. दोन्ही देशांमधील गुंतवणूक वाढेल याशिवाय सामान्य लोकांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील. एफटीएमुळं औषधं, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फॅशनचं साहित्य, स्वस्त होईल. काही गोष्टी महागतील यामुळं याचा परिणाम थेट सामान्य जनतेवर होणार आहे.  

भारताला कोणत्या गोष्टींचा फायदा होणार?

वस्त्रोद्योग आणि कापड व्यापार

भारतातून ब्रिटनला निर्यात केल्या जाणाऱ्या कापड आणि होम टेक्सटाईल उत्पादनांवर सध्या 8 ते 12 टक्के टॅरिफ आहे ते रद्द केलं जाईल. यामुळं भारत आता बांगलादेश आणि व्हिएतनाम या सारख्या कापड निर्यातदार देशांचा स्पर्धक बनेल. 
 
रत्न, दागिने आणि चर्मोद्योग

या करारामुळं सोने आणि हिरे यासारख्या मौल्यवान उत्पादनांसह चामड्याच्या वस्तूंवरील कर देखील ब्रिटनकडून हटवला जाईल. यामुळं कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. भारताच्या लघुउद्योग आणि अलिशान ब्रँडसला याचा फायदा होईल. 

अभियांत्रिकी वस्तू आणि ऑटो पार्टस

भारतात बनवल्या जाणाऱ्या मिशनरी, अभियांत्रिकी टूल्स, वाहनांचे  सुटे भाग यावर ब्रिटनकडून आयात शुल्क लादलं जाणार नाही. त्यामुळं यूके आणि यूरोपच्या औद्योगिक सप्लाय चेनमध्ये भारताची भागीदारी वाढेल. 

आयटी आणि प्रोफेशनल सेवा

मुक्त व्यापार करारामुळं इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर आणि अकाऊंटिंग या क्षेत्रात प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स आणि व्हिसा नियमांमध्ये सूट दिली जाईल. भारताचे प्रोफेशनल्स आता ब्रिटनमध्ये जाऊन काम करु शकतात. यामुळं आयटी, फायनान्स, कायदा आणि आरोग्य या क्षेत्रात पाच वर्षात 60000 नव्या नोकऱ्या निर्माण होऊ शकतात. 

औषधं आणि वैद्यकीय उपकरण

या व्यापार करारामुळं भारतीय औषधं कंपन्यांना ब्रिटनमधील नियामक प्रक्रिया सोपी झाल्यानं फायदा होईल. औषधं स्वस्त होतील.जेनेरिक औषधांची निर्यात होऊ शकते. भरतीय कंपन्यांच्या औषधांना मंजुरी प्रक्रिया सोपी होईल. 

अन्न प्रक्रिया, चहा , मसाले आणि सागरी उत्पादनं

बासमती तांदूळ, झींगा यासारखी सागरी उत्पादनं, प्रिमियम चहा, मसाले यासह भारतीय कृषी उत्पादनांच्या आयातीवरील कर हटवले जातील. आसाम, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगालच्या राज्यातील निर्यातदारांना फायदा होईल. 

केमिकल्स आणि स्पेशालिटी मटेरिअल्स

मुक्त व्यापार करारामुळं कृषी क्षेत्रातील रसायनं, प्लास्टिक, स्पेशल केमिकल्स यावरील कमी टॅरिफ मुळं गुजरात आणि महाराष्ट्रच्या निर्यातदारांना फायदा होईल. व्यापार करारानुसार 2030 पर्यंत ब्रिटनसोबत रसायन निर्यात दुप्पट करण्याचं भारताचं लक्ष आहे. 

ग्रीन एनर्जी आणि क्लीन टेक

या करारामुळं सौर ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या पायाभूत सुविधा यामुळं रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात भारत आणि ब्रिटनच्या संयुक्त कंपन्या सुरु होऊ शकतात. ब्रिटन भारतातील क्लीन एनर्जी क्षेत्रात गुंतवणूक करु शकते.  

दारुवरील आयात शुल्क कमी (ब्रिटनला फायदा)

भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार कराराचा फायदा दारु पिणाऱ्यांना होणार आहे. भारत पुढील 10 वर्ष स्कॉच व्हिस्कीवर 150 टक्के टॅरिफ  घटवून 30 टक्के करेल. भारत आणि ब्रिटन यांच्यातील व्यापार वाढेल. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Mutual Fund : 2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
2025 मध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक घटली, घसरणीची कारणं समोर, SIP मुळं बाजाराला दिलासा
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
70 बिनविरोध निवडीवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल; चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, सांगितलं राज'कारण'
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
Embed widget