एक्स्प्लोर

Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?

Share Market Crash : जागतिक परिस्थिती सुधारल्यास बाजारात स्थिरता येऊ शकते, मात्र तणाव वाढल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई : जागतिक पातळीवरील तणाव आणि वाढत्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात (Share Market) मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या व्यवहारात सेन्सेक्स तब्बल 1700 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 22,850 च्या खाली घसरला. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचं समोर आलं आहे.

बाजारातील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे. विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक, इंडिगो यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव दिसून आला.

Stock Market Fall Reason : घसरणीमागची प्रमुख कारणं

शेअर बाजारातील या मोठ्या घसरणीमागे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणांचा परिणाम दिसून आला. अमेरिका-इराण संघर्षामुळे जागतिक बाजारात अनिश्चितता वाढली आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, रुपयाची घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारावर दबाव आला आहे.

Market Loss Impact : गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

या घसरणीत गुंतवणूकदारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काही तासांतच लाखो कोटी रुपयांची संपत्ती पाण्यात गेली. सलग काही दिवसांच्या तेजीनंतर अचानक आलेल्या या घसरणीमुळे छोट्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

Reliance Share Fall : रिलायन्ससह मोठे शेअर्स कोसळले

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही 4 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. सरकारकडून विंडफॉल टॅक्स पुन्हा लागू करण्याच्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक भावना निर्माण झाली आहे.

Future Market Outlook : पुढे काय होणार?

तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती ‘वेट अँड वॉच’ अशी असून बाजारात अजूनही चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. जागतिक परिस्थिती सुधारल्यास बाजारात स्थिरता येऊ शकते, मात्र तणाव वाढल्यास आणखी घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget