एक्स्प्लोर

हजारो कर्मचाऱ्यांना दिला नारळ, टाटा, रिलायन्ससारख्या कंपन्यांकडून नोकरकपातीचा धडाका, कारण काय?

टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात केली असून तब्बल 52000 नोकरदार घरी बसले आहेत.

Layoffs in India:  कोरोना महामारीच्या काळात जसे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी 'कॉस्ट कटिंग'च्या नावाखाली नोकर कपातीचा धडाका लावला होता. त्यानंतर नोकऱ्यांमध्ये आता कुठे थोडी स्थिरता दिसत असताना टाटा, रिलायन्ससारख्या दिग्गज कंपन्यांनी नोकरकपात केली असून तब्बल 52000 नोकरदार घरी बसले आहेत. कंपन्यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालातून ही आकडेवारी समोर आली असून टाटा, रिलायन्स, रेमंड, स्पेन्सर अशा नावाजलेल्या कंपन्यांनी हजारो कामगारांची नोकर कपात केली आहे.

गेल्या आर्थिक वर्षात केवळ रिटेल क्षेत्रात ५२ हजार नोकरदारांनी काम गमावलं होतं. सर्वाधिक कर्मचारी कपत यंदा रिलायन्स रिटेलने केल्याचं दिसून येत आहे. 38 हजार 29 जणांना कामावरून कमी कले आहे. कर्मचाऱ्यांच्या बाबतीत रिलायन्स रिटेल ही देशांतर्गत किरकोळ बाजारातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ताज्या अहवालानुसार त्यांनी २०२३-२४  या आर्थिक वर्षात 22 हजार 564 झाली आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत 4217 ने कमी आहे.

या कंपन्यांनी वाढवले कर्मचारी

एकीकडे रिलायन्स, स्पेन्सरसारख्या बड्या कंपन्यांनी नोकरकपाट करत असताना दुसरीकडे  डीमार्ट, टाटा, व्ही मार्ट या कंपन्यांनी कर्मचारी वाढवले आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात 19,716 होती, जी 2023-24 मध्ये 29]275 एवढी झाली आहे. व्हीमार्टनेही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असून 9,333 वरून 10,935 पर्यंत वाढवली आहे.

नक्की कशामुळे करण्यात आली नोकरकपात?

मागणीचा जोर ओसरल्याने किरकोळ क्षेत्रावर सध्या मोठ्या प्रमाणात कपातीची वेळ आली आहे. वर्षभरात आघाडीच्या कंपन्यांनी तब्बल 52 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची कर्मचारी कपात केली आहे. लाइफस्टाईल, ग्रॉसरी रिटेलर्स आणि रेस्टॉरंटने मागील वर्षाच्या तुलनेत २६ हजार कर्मचारी कमी केले आहेत. विक्रेत्यांकडे एकूण ४.५५ लाख कर्मचारी होते. ही संख्या वर्षभरात ४.२९ लाखांवर आली आहे. सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार किरकोळ क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या स्टोअरर्सचा विस्तार ९ टक्क्यांनी केलाय. हा दर मागील पाच वर्षांचा निचांक ठरला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget