एक्स्प्लोर

शहरात राहणं झालं महाग, घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये 25 ते 30 टक्‍क्‍यांची वाढ; काय सांगतो हाऊसिंग डॉटकॉम अहवाल?

देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये वाढ झाल्याची माहिती हाऊसिंग डॉटकॉमने दिली आहे. ही वाढ 25 ते 30 टक्क्यांनी झाली आहे.

Increase in House Rent: देशातील प्रमुख शहरांमधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये वाढ झाल्याची माहिती हाऊसिंग डॉटकॉमने दिली आहे. ही वाढ 25 ते 30 टक्क्यांनी झाली आहे. 2019 पासून प्रमुख शहरांमधील टॉप मायक्रो-मार्केट्समधील घरांच्‍या भाडेदरांमध्‍ये 25 ते 30 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. दरम्‍यान, 2019 च्‍या महामारीपूर्वीच्‍या काळाच्‍या तुलनेत प्रमुख 8 शहरांमधील निवासी मालमत्तांसाठी सरासरी मासिक भाडेदरांमध्‍ये 15 ते 20 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. 

भाडेदरांमधील या वाढीचे श्रेय भाडेउत्‍पन्‍नांतील पुरेशा वाढीला जाते. हे सकारात्‍मक ट्रेण्‍ड्स असताना देखील न्यूयॉर्क, लंडन, दुबई आणि सिंगापूर अशा जागतिक रिअल इस्‍टेट हब्‍सच्‍या तुलनेत मोठ्या प्रमाणात पोकळी आहे. या सर्व बाबी हाऊसिंग डॉटकॉमच्‍या अहवालामधून निदर्शनास आल्‍या आहेत. देशातील आघाडीचे रिअल इस्‍टेट टेक व्‍यासपीठ हाऊसिंग डॉटकॉम चा नवीन अहवाल 'रेसिडेन्शियल रेण्‍ट्स ऑन द राइज! ए रिपोर्ट ऑन रेण्‍टल प्रॉपर्टी इन इंडिया' अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये मासिक सरासरी भाडेदरामधील वाढ भांडवल मूल्‍यांमधील वाढीपेक्षा उच्‍च आहे.

कोरोना महामारीनंतर घरांच्या भाड्यात मोठी वाढ

प्रमुख शहरांमधील मालमत्ता किमतींमध्‍ये 2019 च्‍या महामारीपूर्वीच्‍या काळाच्‍या तुलनेत 15 ते 20 टक्‍क्‍यांची वाढ झाली, तर सरासरी मासिक भाडेदरांमध्‍ये 25 ते 30  टक्‍क्‍यांनी वाढ झाली. तसेच सेवा क्षेत्रातील अग्रणी शहरांमधील विशिष्‍ट प्रमुख ठिकाणी याच कालावधीदरम्‍यान भाडेदरांमध्‍ये 30 टक्‍क्‍यांची मोठी वाढ दिसण्‍यात आली. हाऊसिंग डॉटकॉम आयआरआयएस इंडेक्‍समधून निदर्शनास आले की, महामारीनंतरच्‍या काळात मध्‍यम भाडेदरासह घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीत वाढ झाली आहे. या इंडेक्‍समधून निदर्शनास येते की, महामारीनंतरच्‍या काळात ऑनलाइन रेण्‍टल सर्च क्रियाकलापामध्‍ये गृहखरेदीच्‍या तुलनेत वाढ झाली आहे. सध्‍या भाडेदरासाठी आयआरआयएस इंडेक्‍स 23 पॉइण्‍ट्सवर आहे, जो घर खरेदी करण्‍याबाबतच्‍या इंडेक्‍सच्‍या तुलनेत उच्‍च आहे.

हाऊसिंग डॉटकॉम, प्रॉपटायगर डॉटकॉम आणि मकान डॉटकॉमचे ग्रुप सीईओ श्री. ध्रुव अग्रवाल म्‍हणाले, ''महामारीनंतर खरेदी व भाड्याने देण्‍यासंदर्भात घरांच्‍या मागणीमध्‍ये वाढ झाली आहे. गृहनिर्माण बाजारपेठेतील किमतींत गेल्‍या दोन वर्षांमध्‍ये मोठी वाढ झाली आहे, जी जवळपास दशकाएवढी आहे. शहरामध्‍ये सरासरी किंमत वाढ पुरेशा प्रमाणात आहे, पण काही प्रमुख शहरांमध्‍ये वाढ मोठ्या प्रमाणात आहे.''

या शहरांमध्ये घरांच्या भाड्यात मोठी वाढ

हाऊसिंग डॉटकॉम येथील संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद म्‍हणाल्‍या की, उच्च व्याजदर आणि संपादन खर्च यांसारख्या कारणांमुळं भारतातील भाडे परतावा ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे. पण मालमत्तेच्‍या वाढत्‍या किमती, संभाव्य खरेदीदारांसाठी परवडण्‍याच्‍या बाबतीतील आव्हाने आणि तयार सदनिकांबाबत यादीचा मर्यादित पुरवठा यासह महामारीनंतर घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. गुरुग्राम, बंगळुरु, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या सेवा क्षेत्रातील प्रबळ शहरांच्या सीबीडीमध्ये 25 ते 30 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ दिसण्‍यात आली आहे.

पुढील 2 ते 3 वर्षांमध्‍ये बाजारपेठेत नवीन तयार सदनिकांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात असणार आहे. ज्‍यामुळं आम्‍हाला घर भाड्याने देण्‍याच्‍या मागणीमधील वाढ कायम राहण्‍याची अपेक्षा आहे. या शाश्‍वत वाढीमुळं मध्‍यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांमध्‍ये रूची निर्माण झाली आहे. ज्‍यामधून रेण्‍टल बाजारपेठेत उदयोन्‍मुख संधी दिसून येत असल्याची माहिती हाऊसिंग डॉटकॉम येथील संशोधन प्रमुख श्रीमती अंकिता सूद यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या:

Income Tax: तुमच्या पत्नीला घरभाडे देऊन करात सूट मिळवू शकता, 'या' सहा गोष्टी फॉलो कराव्या लागतील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget