एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कसं कराल आयकर बचतीचं नियोजन? 'या' 5 पर्यायांचा वापर करा, आयकर वाचवा

2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. त्यापुर्वी तुम्ही कर बचतीचं (Income Tax Saving) नियोजन केलं आहे का? जर तुम्ही कर बचतीचं नियोजन केलं नसेल तर ते करणं गरजेचं आहे.

Income Tax Saving : 2023-24 हे आर्थिक वर्ष संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. त्यापुर्वी तुम्ही कर बचतीचं (Income Tax Saving) नियोजन केलं आहे का? जर तुम्ही कर बचतीचं नियोजन केलं नसेल तर ते करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला कर बचत करायची असेल तर काही महत्वाच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जर तुम्ही कर बचतीचं योग्य नियोजन केलं तर तुमचा पगार कट केला जाणार नाही.  

चालू आर्थिक वर्ष संपायला थोडाच अवधी शिल्लक आहे. त्यामुळं बहुतेक करदात्यांनी आधीच त्यांचे आर्थिक नियोजन सुरु केलं असेल. मात्र, ज्यांनी आणखी कर बचतीचं नियोजन केलं नाही, अशा लोकांनी ते नियोजन करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेला पैसा कसा आणि कुठे गुंतवायचा? याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला कर वाचवण्यासाठी नेमकं काय करावं, यासंदर्भातील माहिती देणार आहोत. कर बचतीसाठी वेळेपूर्वी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आयकर विभागाला पुरावा म्हणून द्यावी लागतात. तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत काही योजनांमध्ये गुंतवणूक करुन ITR दरम्यान कपातीचा दावा करु शकता. यासाठी तुम्ही विविध सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. या योजनांमध्ये कर बचतीसोबतच परतावाही उत्कृष्ट आहे. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात NSC, सुकन्या समृद्धी योजना, PPF, NPS यांचा समावेश आहे.

कर बचतीचा पहिला पर्याय काय? 

PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. भारतातील सर्वात लोकप्रिय कर बचत योजना म्हणून याकडं बघितलं जातं. सध्या PPF वर 7.1 टक्के दराने व्याज मिळते. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करु शकता. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्हाला पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर कर सूट मिळू शकते. पीपीएफमधील गुंतवणुकीवर सरकार हमी देते. म्हणजे पैसे गमावण्याची भीती नसते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मधील पैसे 15 वर्षे लॉक इन असतात.

कर बचतीचा दुसरा पर्याय काय?

NPS नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) ही सरकारी सेवानिवृत्ती बचत योजना आहे. यामध्ये देखील, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे. तुम्ही कलम 80CCD (1B) अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये आणि अतिरिक्त 50 हजार रुपये देखील गुंतवू शकता. NPS मध्ये गुंतवणूक करुन, तुम्ही प्राप्तिकरात एकूण 2 लाख रुपयांची सूट मिळवू शकता. सरकार एनपीएसलाही प्रोत्साहन देत आहे. तुम्ही 1000 रुपये दरमहा गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. 18 ते 65 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत खाते उघडू शकतो. एनपीएस खाते कोणत्याही बँकेत उघडता येते.

कर बचतीचा तिसरा पर्याय काय? 

SSY योजना म्हणजे तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करून कर वाचवू शकता, विशेषत: मुलींसाठी सरकारद्वारे चालवली जात असलेली एक छोटी बचत योजना. तुम्ही तुमच्या 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर सुकन्या समृद्धी योजना (SSY) मध्ये खाते उघडून कर वाचवू शकता. या योजनेत वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करून आयकर सूट मिळू शकते. अलीकडेच, सरकारने व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे आणि सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज 8.2 टक्के केले आहे. याचा अर्थ, कर सवलतीसह, तुम्हाला मजबूत परतावा देखील मिळतो.

कर बचतीचा चौथा पर्याय काय?

कर बचतीचा पुढील पर्याय म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS. ही देखील एक अतिशय लोकप्रिय बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही तुमचे खाते बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता. यामध्ये केलेल्या गुंतवणुकीद्वारे तुम्ही खात्यात जमा केलेल्या रकमेवर 80C अंतर्गत आयकर सूट मिळवू शकता. यामध्ये तुम्ही वार्षिक जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच सरकारने व्याजदरातही बदल करून ते 8.2 टक्के केले आहेत.

कर बचतीचा पाचवा पर्याय काय?

ELSS इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) हा एक प्रकारचा इक्विटी फंड आहे. हा एकमेव म्युच्युअल फंड आहे. जो आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट देतो. ELSS मध्ये वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतच्या परताव्यावर/नफ्यावर कोणताही कर नाही. ELSS मध्ये 3 वर्षांचा सर्वात कमी लॉक-इन कालावधी आहे जो सर्व कर बचत गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. याशिवाय तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडी आणि युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (युलिप) खरेदी करूनही कर वाचवू शकता.

महत्वाच्या बातम्या:

Tax Saving Schemes : ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान ठरतात सरकारच्या या योजना, 1.5 लाखांपर्यंत बचतही करतात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raosaheb Danve Navi Delhi : आमचे नेतृत्व दिल्लीत; म्हणून तेथूनच निर्णय होईलJitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोललेUdayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Embed widget