एक्स्प्लोर

Income Tax : उद्यापासून आयकर नियमांमध्ये होणार मोठे बदल! आज तुमची रिटर्न फाइल पूर्ण करण्यासाठी शेवटची संधी

1 एप्रिल म्हणजेच उद्यापासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल. 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रिप्टो करन्सीसारख्या डिजिटल मालमत्तेतून नफ्यावर 30 टक्के कर आकारला जाईल अशी घोषणा केली होती.

Income Tax : 1 एप्रिल म्हणजेच उद्यापासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रिप्टो करन्सीसारख्या डिजिटल मालमत्तेतून नफ्यावर 30 टक्के कर आकारला जाईल अशी घोषणा केली होती. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 अंतर्गत 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. ज्यामध्ये क्रिप्टो टॅक्सेशन सुरू होणार आहे. अपडेटेड रिटर्न भरताना काही बदल करण्यात आले आहेत. EPF व्याजावरील नवीन कर नियम आणि कोविड-19 उपचारांवरील कर सवलत देखील समाविष्ट करण्यात आलीय.

ईपीएफ खाते
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यावर 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या करमुक्त योगदान मर्यादेचा समावेश आहे.

ITR मध्ये बदल
आयकर विवरणपत्रात आणखी एक मोठा बदल करण्यात येत आहे. करदात्यांना संबंधित मूल्यांकन वर्ष संपल्यापासून दोन वर्षांच्या आत आयकर रिटर्नमध्ये झालेल्या चुकांसाठी अपडेटेड रिटर्न भरण्याची मुभा असेल.यापूर्वी, कर रिटर्नमध्ये सुधारणा करण्यासाठी, रिटर्न भरण्याच्या नियत तारखेपासून फक्त 5 महिन्यांचा कालावधी असेल. तसेच कोणतीही व्यक्ती अतिरिक्त नुकसान किंवा कर दायित्व कमी झाल्याची तक्रार करण्यासाठी अपडेटेड रिटर्न दाखल करू शकणार नाही.

म्युच्युअल फंड
म्युच्युअल फंड किंवा देशांतर्गत कंपन्यांकडून मिळालेला लाभ यापुढे कराच्या कक्षेत ठेवला जाईल. उच्च कराच्या गुंतवणूकदारांवर अधिक कर आकारला जाईल, तर कमी कर गुंतवणूकदारांवर कमी ओझे असेल.

कोविड उपचार
नव्या नियमांनुसार राज्य सरकारी कर्मचारी, कोविड प्रभावित कुटुंबे आणि अपंग व्यक्तींसाठीच्या तरतुदींचाही समावेश आहे.कोविड बाधित कुटुंबांनाही कर सवलतीच्या विशेष तरतुदी उपलब्ध असतील.मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांपर्यंत मिळालेल्या रकमेवर कोणताही कर आकारला जाणार नाही, जर त्यांना ही रक्कम मृत्यूनंतर 12 महिन्यांच्या आत मिळाली असेल. अशा व्यक्तींच्या पालकांनी त्यांच्यासाठी विमा योजना विकत घेतल्यास, ते विशिष्ट परिस्थितीत कर सवलतीचा दावा देखील करू शकतात.

सरकारी सेवा कर्मचारी
राज्य सरकारी कर्मचारी कलम 80CCD(2) अंतर्गत नियोक्त्याद्वारे त्यांच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या 14 टक्क्यांपर्यंत NPS योगदानासाठी कपातीचा दावा करू शकतात.

क्रिप्टो कर
शेवटी, क्रिप्टो चलनासह डिजिटल मालमत्तेवरील कर आकारणीने गुंतवणूकदारांकडून जास्तीत जास्त टीका करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रिप्टो करन्सीसारख्या डिजिटल मालमत्तेतून नफ्यावर 30 टक्के कर आकारला जाईल अशी घोषणा केली.तसेच गुंतवणूकदारांकडून अशा प्रकारे शुल्क आकारले जाईल, डिजिटल मालमत्ता प्राप्तकर्त्यांवर देखील कर आकारला जाईल. भेटवस्तू म्हणून डिजिटल मालमत्ता प्राप्त करणाऱ्या प्राप्तकर्त्यांना काही अटींच्या अधीन राहून 1% TDS आणि भेट कर भरावा लागेल.

आज आयकर रिटर्न भरू शकता

आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 रोजी संपली आहे. आयकर रिटर्न भरण्याची ही शेवटची तारीख होती. तुम्ही अद्याप आर्थिक वर्ष 2020-21 आणि मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही 31 डिसेंबर 2021 पर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरले नसेल तर तुम्ही 31 मार्च 2022 पर्यंत आयकर रिटर्न भरू शकता. परंतु,  यासाठी तुम्हाला थोड्या प्रमाणात दंड भरावा लागेल.  

किती दंड भरावा लागणार?
आयकर रिटर्न भरण्याच्या अंतिम मुदत 31 डिसेंबर 2021 नंतर तुम्ही मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी रिटर्न भरल्यास पाच हजार रुपये दंड भरावा लागेल. पाच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न कमी असेल तर एक हजार रुपये दंड भरावा लागेल. जर तुम्ही 31 मार्च 2022 नंतर मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरले तर तुम्हाला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. 31 मार्च 2022 पर्यंत आयकर रिटर्न न भरल्यास आयकर विभाग तुम्ही जमा न केलेल्या कराच्या 50 टक्के इतका दंड देखील आकारू शकतो.  मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न भरण्याची पहिली शेवटची तारीख 31 जुलै 2021 होती. नंतर ती 20 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर 31 डिसेंबर 2021 ही आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती. आता मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 करण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी आता तुम्हीला थोडा दंड भरावा लागेल.

संबंधित बातम्या

PAN Aadhaar Link : 'या' व्यक्तींना पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक नाही, जाणून घ्या काय आहे कारण?

रिटर्नची ड्यू डेट चुकवली, तर आयकर रिफंड मिळणारच नाही, जाणून घ्या कारण  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget