(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारतात या वर्षी 86 टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा, हे आहे कारण
Michael Page Report: भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Michael Page Report: भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. Recruitment एजन्सी मायकेल पेजच्या (Michael Page Report) अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या अहवालानुसार, 86 टक्के कर्मचारी पुढील 6 महिन्यांत त्यांच्या नोकरीचा राजीनामा देऊ इच्छित आहेत. चांगल्या पगारासह वर्क लाईफ बॅलन्ससाठी (Work Life Balance) कर्मचारी नोकरी सोडण्यास तयार असतात.
अहवालानुसार, 61 टक्के असे कर्मचारी आहेत ज्यांना त्यांच्या वर्क लाईफ बॅलन्ससाठी नोकरीचा राजीनामा द्यायचा आहे. अहवालानुसार, कोरोना महामारीनंतर नोकरीचा राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत त्याला आणखी वेग येईल.
कोविडचे नियमांवरून वाद
मोठ्या संख्येने कर्मचार्यांनी नोकरी सोडल्याचा परिणाम सर्व प्रकारच्या बाजारपेठा आणि उद्योगांमध्ये दिसून येईल. या अहवालात सांगण्यात आले आहे की, पुढील काही महिन्यांत उत्कृष्ट प्रतिभा असलेले लोक आपली नोकरी सोडून अधिक पगार असलेली नोकरी शोधू शकतात. याशिवाय अनेक कार्यालयांमध्ये कोविडचे नियम पाळण्याबाबत वाद सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर (Work From Home) आवडले नाही, असे 11 टक्के कर्मचारी आता नोकरी सोडण्याच्या तयारीत आहेत.
नोकरी सोडण्यात भारतीय कर्मचारी आघाडीवर
अनेक कर्मचारी करिअर ग्रोथ, कमी पगार, करिअर रोल किंवा इंडस्ट्रीतील बदल आणि कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होऊन राजीनामा देत आहेत. 12 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतीय कर्मचारी नोकरी सोडण्यात आघाडीवर आहेत. भारतातील बहुतेक कर्मचारी येत्या काही दिवसांत नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. भारतानंतर इंडोनेशिया, फिलीपिन्स, मलेशिया, थायलंड आणि दक्षिण पूर्व आशियाचा क्रमांक लागतो. अहवालानुसार, खाजगी क्षेत्रापेक्षा सरकारी कर्मचारी नोकरी सोडण्यास अधिक इच्छुक आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: