Hurun India Rich List : स्वकर्तृत्वावर मिळवलं 47 हजार कोटींचं साम्राज्य, कोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत महिला?
झोहो कंपनीच्या सह-संस्थापक राधा वेम्बू (Radha Vembu) यांनी यावर्षी आश्चर्यकारक कामगिरी केलीय. त्या हुरुन इंडिया रिच लिस्ट (Hurun India Rich List 2024) मध्ये देशातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत.
Hurun India Rich List: भारतातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी झोहोच्या ((Zoho)) सह-संस्थापक राधा वेम्बू (Radha Vembu) यांनी यावर्षी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 (Hurun India Rich List 2024) मध्ये, त्या देशातील सर्वात श्रीमंत स्व-निर्मित महिला बनल्या आहेत. राधा वेम्बूची एकूण संपत्ती 47,500 कोटी रुपये आहे. Nykaa च्या फाल्गुनी नायर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 32,200 कोटी रुपये आहे. तर अरिस्ता नेटवर्क्सच्या सीईओ जयश्री उल्लाल 32,100 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.
राधा वेम्बू यांनी स्वबळावर संपत्ती निर्माण केली
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 मध्ये अशा महिलांना स्थान देण्यात आले आहे ज्यांनी स्वबळावर संपत्ती निर्माण केली आहे. ही संपत्ती त्याला वारसाहक्काने मिळाली नाही. झोहोचे सीईओ श्रीधर वेम्बू यांची बहीण राधा वेम्बू यांना प्रसिद्धीच्या झोतात येणं आवडत नाही. राधा वेम्बू यांच्याकडं झोहोचे सर्वाधिक शेअर्स आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत श्रीधर वेम्बू 55 व्या क्रमांकावर आहेत. राधा वेम्बू ही भारतातील सर्वात यशस्वी महिला उद्योगपती मानली जाते. या यादीत जुही चावलाचाही समावेश झाला आहे. त्यांची एकूण संपत्ती 4600 कोटी रुपये इतकी आहे.
नेहा बन्सल, किरण मुझुमदार शॉ आणि इंदिरा नूयी यांचाही समावेश
लेन्सकार्टच्या सह-संस्थापक नेहा बन्सल यांचाही हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये (Hurun India Rich List) समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत बायोकॉनचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष किरण मुझुमदार शॉ यांना बायोटेक्नॉलॉजी आणि फार्मा उद्योगातील योगदानाबद्दल स्थान देण्यात आले आहे. याशिवाय कॉन्फ्लुएंटच्या सह-संस्थापक नेहा नारखेडे आणि कुटुंब आणि पेप्सीकोच्या माजी सीईओ इंद्रा के नूयी यांनाही स्थान मिळाले आहे. या महिलांनी स्वकर्तृत्वार स्वत:चं साम्राज्य उभं केलं आहे.
'या' आहेत देशातील टॉप 10 सेल्फ मेड अब्जाधीश महिला
राधा वेम्बू - 47500 कोटी (झोहो)
फाल्गुनी नायर - 32200 कोटी (नायका)
जयश्री उल्लाल - 32100 कोटी (अरिस्ता नेटवर्क्स)
किरण मुझुमदार शॉ – 29000 कोटी रुपये (बायोकॉन)
नेहा नारखेडे – 4900 कोटी रुपये (संगम)
जुही चावला – 4600 कोटी रुपये (नाइट रायडर्स स्पोर्ट्स)
इंदिरा के नूयी - 3900 कोटी (पेप्सिको)
नेहा बन्सल – 3100 कोटी रुपये (लेन्सकार्ट)
देविता राजकुमार सराफ - 3000 कोटी (यूव्ही टेक्नॉलॉजीज)
कविता सुब्रमण्यम - 2700 कोटी (अपस्टॉक्स)
महत्वाच्या बातम्या:
Hurun India Rich List : अमिताभ बच्चनसह शाहरुख खान प्रथमच श्रीमंतांच्या यादीत, नेमकी किती आहे संपत्ती?