Hurun India Rich List : अमिताभ बच्चनसह शाहरुख खान प्रथमच श्रीमंतांच्या यादीत, नेमकी किती आहे संपत्ती?
बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने (Shahrukh Khan) प्रथमच देशातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
Hurun India Rich List 2024 : बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने (Shahrukh Khan) प्रथमच देशातील श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. Hurun India ची श्रीमंतांच्या यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये या दोघांसह अनेकांचा समावेश करण्यात आला आहे. आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की शाहरुख खानची संपत्ती किती? तर शाहरुख खानची एकूण संपत्ती ही 7300 कोटी रुपये आहे.
शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील भागीदारीमुळे या यादीत आपले स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन, जुही चावला आणि कुटुंब, करण जोहर आणि हृतिक रोशन यांचाही पहिल्यांदाच ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
मनोरंजन क्षेत्रातल्या 7 लोकांनी वर्षभरात मिळवली 40500 कोटींची संपत्ती
हुरुन इंडियाचे संस्थापक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट आणि चित्रपट हे भारतातील महत्वाची दोन क्षेत्र आहेत. आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्समधील होल्डिंग व्हॅल्यूमुळे चित्रपट स्टार शाहरुख खानचा पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समावेश करण्यात आल्याचे ते म्हणाले. मनोरंजन उद्योगातील सात लोकांनी, ज्यांना पहिल्यांदाच हुरुन इंडिया रिच लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे, त्यांनी एका वर्षात 40,500 कोटी रुपयांची संपत्ती जोडली आहे.
महत्वाच्या बातम्या: