नवीन वर्षात घरांची मागणी वाढणार, 45 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घरांना सर्वाधिक मागमी राहणार
नवीन वर्ष 2024 मध्ये देखील देशात घरांच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. 45 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंतची किंमत असणाऱ्या घरांच्या मागणीत सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता आहे.
Housing Sector : 2023 प्रमाणे, नवीन वर्ष 2024 मध्ये देखील देशात घरांच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. 45 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांपर्यंतची किंमत असणाऱ्या घरांच्या मागणीत सर्वाधिक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच लक्झरी विभागातील 2 ते 4 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीच्या घरांची मागणी देखील वाढणार आहे.
CBRE ने 2024 मध्ये निवासी क्षेत्राच्या दृष्टीकोनाच्या अहवालात म्हटले आहे की देशातील नामांकित निवासी विकासक नवीन शहरांमध्ये संधी शोधतील. जेणेकरून ते त्यांचा पोर्टफोलिओ वाढवू शकतील. ब्रँड मूल्याचा फायदा घेऊ शकतील. CBRE च्या मते, 2023 मध्ये दिसलेली गृह खरेदीची भावना 2024 मध्येही कायम राहील. अहवालानुसार, मिड-सेगमेंट परवडणाऱ्या श्रेणीसह, नवीन वर्षात प्रीमियम लक्झरी घरांची मागणीही मजबूत राहील.
व्याजदर न वाढल्यानं सेंटिमेंट सुधारते
RBI ने वाढत्या व्याजदरांना ब्रेक लावल्यामुळे घर खरेदीत सुधारणा होईल. रिअल इस्टेट क्षेत्राला या बंदीचा फायदा होईल. जेव्हा महागाई कमी होईल तेव्हा व्याजदर कपातीचा कालावधी देखील सुरू होऊ शकतो. चलनविषयक धोरण जाहीर करताना RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.
महागड्या कर्जाचा मागणीवर कोणताही परिणाम नाही
CBRE ने आपल्या अहवालात म्हटले आहे की, गृहकर्जावरील व्याजदरात वाढ होऊनही घरांच्या मागणीवर कोणताही परिणाम झालेला नाही. जानेवारी ते सप्टेंबर 2023 या कालावधीत 2.30 लाख गृहनिर्माण युनिटची विक्री झाली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 टक्के अधिक आहे. या कालावधीत विकासकांनी 2.20 लाख नवीन गृहनिर्माण युनिट लॉन्च केले आहेत. मिड-सेगमेंट हाऊसिंग हा निवासी मागणीचा एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहे, परंतु लक्झरी प्रीमियम विभागातील घरांची मागणी देखील 2023 मध्ये वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: