एक्स्प्लोर

Cement Prices: नवीन घराचं स्वप्न महागलं! तीन महिन्यात सिमेंटच्या दरात मोठी वाढ, किती आणि का वाढल्या किंमती? 

सध्या सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून सिमेंटच्या दरात वाढ सुरु आहे.  

House Construction Cost: जे लोक घर बांधण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे. कारण सध्या सिमेंटच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून सिमेंटच्या दरात वाढ सुरु आहे.  त्यामुळं घर बांधण्याच्या खर्चातही सातत्यानं वाढ होत आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात हा दरवाढीचा कल कायम राहण्याची शक्यता आहे.

ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये सिमेंटच्या दरात 4 टक्क्यांची वाढ 

काही महिन्यांच्या दिलासानंतर पुन्हा एकदा सिमेंटचे दर वाढू लागले आहेत. सप्टेंबर तिमाहीत सिमेंटच्या किंमतीत लक्षणीय वाढ दिसून आली होती. त्यामुळं घर बांधण्याचा खर्चही सातत्याने वाढत आहे. येत्या काही दिवसांतही हा वाढीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात सिमेंटच्या सरासरी किमती एक महिन्यापूर्वी म्हणजेच ऑगस्टच्या तुलनेत 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जर आपण संपूर्ण तिमाहीबद्दल बोललो तर, सप्टेंबर तिमाहीत सिमेंटचे दर हे मागील तिमाहीच्या म्हणजेच एप्रिल-जून 2023 च्या सरासरी किमतीपेक्षा 0.5 टक्के ते 1 टक्क्यांनी जास्त आहेत. 

 प्रति बॅग 50 ते 55 रुपयांची वाढ 

जेफरीज इंडियाच्या विश्लेषकांचे मत आहे की सिमेंटच्या किमतीतील ही वाढ प्रामुख्याने पूर्व भारतातील सिमेंटच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आहे. वाढलेल्या किंमतीचा बोजा सहन करण्याऐवजी आता सिमेंट कंपन्या ग्राहकांवर काही भाग टाकत आहेत. ऊर्जा खर्चामुळं सिमेंट कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सिमेंटच्या किरकोळ किमती वाढवल्या जात आहेत. जेफरीज इंडियाच्या मते, सिमेंटच्या किमती पूर्व भारतात सर्वाधिक वाढल्या आहेत.  सप्टेंबरअखेरपर्यंत सिमेंटच्या दरात प्रति बॅग 50 ते 55 रुपयांची वाढ झाली आहे. तर देशाच्या इतर भागात सिमेंटच्या किमती तुलनेने कमी वाढल्या आहेत. या काळात इतर भागांमध्ये प्रति बॅगच्या किमतीत 20 रुपयांची वाढ झाल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली आहे.

काही महिन्यांपूर्वीपर्यंत सिमेंटच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. दीर्घकालीन किंमत अजूनही कमी आहे. जुलै महिन्यात सिमेंट स्वस्त झाले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तेजीचा कल परत वाढला आहे. येत्या काही महिन्यांत तेजीचा कल कायम राहण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी निवडणुकांपूर्वी सरकारी खर्चावर भर दिल्यामुळं या क्षेत्रातील मागणीची स्थिती मजबूत आहे. सध्या तरी दर कमी होण्याची शक्यता नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

डील पक्की... गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी; कितीचा झाला सौदा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
LPG Gas Shortage: केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG चा गॅसपुरवठा थांबवला, देशातील हॉटेल, रेस्टॉरंट इंडस्ट्री ठप्प होण्याची भीती
LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?
Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget