(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवीन घर घेणं झालं स्वस्त, सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देणाऱ्या बँका कोणत्या? बँकांची यादी एका क्लिकवर
नवीन घर (News Home) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण विविध बँकांनी (Bank) आपल्या गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजदार कपात केली आहे.
Cheapest Home Loan: नवीन घर (News Home) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण विविध बँकांनी (Bank) आपल्या गृहकर्जाच्या (Home Loan) व्याजदार कपात केली आहे. त्यामुळं याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. त्यामुळं नवीन घर बांधण्याचं स्वप्न आता स्वस्त झालं आहे. दरम्यान, बँकेकडून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र जमा करावी लागतील. त्यानंतर बँका तुम्हाला कर्जाचा पुरवठा करतील.
तुम्ही देखील गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देखील चागली संधी आहे. बँकांच्या व्याजदरात कपात झाल्यानं घर बांधणीसाठी कमी व्याजदरात पैसे उपलब्ध होती. दरम्यान, कोणकोणत्या बँका कमी दरात गृहकर्ज उपलब्ध करुन देत आहेत, त्याबाबतची माहिती पाहुयात.
कोणत्या बँकांचा गृहकर्जावर किती व्याजदर?
युको बँक - 30 लाख - 8.45 टक्के ते 10.30 टक्के
बँक ऑफ इंडिया - 30 लाख - 8.30 ते 10.75
पंजाब नॅशनल बँक - 30 लाख - 8.45 ते 10.25
पंजाब अॅन्ड सिंध बँक - 30 लाख - 8.50 ते 10
स्टेट बँक ऑफ इंडिया - 30 लाख - 8.40 ते 10.15
बँक ऑफ बडोदा - 30 लाख - 8.40 ते 10.65
युनियन बँक ऑफ इंडिया - 30 लाख - 8.35 ते 10.75
बँक ऑफ इंडियाचे सर्वात कमी व्याजदर
अशा प्रकारचे व्याजदर हे गृहकर्जावर आहेत. Paisa Bazaar.com ने दिलेल्या माहितीनुसार बँक ऑफ इंडिया ही सर्वात कमी व्याजदराने पैसे देत आहे. बँक ऑफ इंडिया ही 8.30 टक्के दराने घरासाठी कर्ज देत आहे. याचा चांगला फायजा ग्राहकांना होत आहे.
या कागदपत्रांची आवश्यकता
दरम्यान, गृहकर्ज घेताना व्याजदराची निश्चितपणे चौकशी करणं गरजेचं आहे. तसेच काही कागदपत्रांची देखील पूर्तात करणं गरजेचं असतं. यामध्ये तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखल, वयाचा पुरावा, ड्रायव्हिंग लायसन ही कागदपत्रे गरजेची आहेत.
महत्वाच्या बातम्या: