(Source: ECI/ABP News/ABP Majha)
FD वर SBI आणि HDFC बँकेपेक्षा जास्त व्याजदर, प्रीमॅच्युअर विड्रॉअलवरही पॅनल्टी नाही
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या स्पेशल एफडी अकाउंटचं वैशिष्ट्य असं आहे की, ठरलेल्या कालावधीच्या आत म्हणजेच प्री-मॅच्युरिटी विड्रॉअलवर कोणतीही पॅनल्टी लागणार नाही.
मुंबई : फिक्स्ड डिपॉझिट (FD) सुरक्षित आणि शाश्वत रिटर्न्स देणाऱ्या गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. परंतु मोठ्या बँकेच्या फिक्स्ड डि्पॉझिटवर मिळणारं व्याज कमी असतं. परंतु गुंतवणूकदार जोखीम घ्यायला तयार नसतात, त्यावेळी त्यांना गुंतवणुकीचा हा उत्तम पर्याय असतो. आता आपण बँका आणि पोस्ट ऑफिससह पेटीएम पेमेंट बँकेत (Paytm Payments Bank) फक्त 100 रुपये जमा करुन एफडी अकाऊंट उघडता येणार आहे आणि तेही ऑनलाईन शक्य होणार आहे.
यासाठी पेटीएम पेमेंट्स बँकने इंडसइंड बँकेसोबत (IndusInd Bank) करार केला आहे. या कराराअंतर्गत आता आपण पेटीएम पेमेंट बँकेत एफडी अकाउंट उघडू शकता. या स्पेशल एफडी खात्यावर आपल्याला SBI, HDFC आणि ICICI बँकेपेक्षा अधिक व्याज मिळणार आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेच्या स्पेशल एफडी अकाउंटचं वैशिष्ट्य असं आहे की, ठरलेल्या कालावधीच्या आत म्हणजेच प्री-मॅच्युरिटी विड्रॉअलवर कोणतीही पॅनल्टी लागणार नाही. ही पहिली एफडी अकाउंट आहे ज्यात प्री- मॅच्युअर विड्रॉअलवर काहीही पॅनल्टी लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही तुमची एफडी मोडू शकता.
पेटीएम पेमेंट्स बँक स्पेशलला 356 दिवसांसाठी करु शकता, त्यानंतर ते ऑटो रिन्यू होईल. तुम्ही 356 दिवस आधी सुद्धा एग्जिट करू शकता. परंतु 7 दिवसांआधी एग्जिट केल्यास तुम्हाला काहीही व्याज मिळणार नाही. या एफडीवर वर्षाला 6 टक्के व्याज मिळेल.
आपण पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये एफडी अकाऊंट सुरु केलं आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्ही सिनियर सिटीझनमध्ये येत असाल तर सिनियर सिटीझन्सला मिळणारं व्याज तुम्हाला मिळेल. म्हणजेच अशा परिस्थितीत 50 बेसिस प्वाइंट अधिक व्याज मिळणार आहे. इतर एफडीवर तुम्हाला इंडसइंड बँकेप्रमाणे व्याज मिळेल.