एक्स्प्लोर

GST : सोमवारपासून महागाई रडवणार; तुमचं खाणं-पिणं, वैद्यकीय सेवा महागणार

GST Rate Hike : सोमवारपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असून महागाई सामन्यांचे कंबरडे मोडणार आहे.

GST Rate Hike : आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना सामान्यांच्या खिशावर आता आणखी भार पडणार आहे. उद्या, 18 जुलैपासून नवीन जीएसटी दर लागू होणार आहेत. सरकारने अनेक नव्या वस्तूंवर जीएसटी लागू केली आहे. नव्या जीएसटी दरानुसार, खाणं-पिण्यासह वैद्यकीय उपचारही महागणार आहेत. त्यामुळे महागाई आणखी रडवणार आहे. अन्नधान्यांवरही जीएसटी लागू होणार आहे.  धान्य आणि डाळीच्या किंमतीत 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले. महागाईचा हा भार ग्राहकांवरच पडणार आहे. शनिवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. त्याच्या परिणामी बाजारपेठांमधील व्यवहार ठप्प होते. 

या गोष्टी महागणार 

पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, टेट्रा पॅकमधील दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. त्याशिवाय, बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. एक हजार रुपयांपेक्षा प्रति दिवस भाडे असणाऱ्या हॉटेल रुम्सवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. एलईडी लाइट्स आणि लॅम्पच्या किंमतीदेखील वाढवण्याची शक्यता आहे. सरकारने या वस्तूंवरील जीएसटी 12 टक्क्यांहून  18 टक्क्यांवर केली आहे.  

सायकल पंप, टर्बाइन पंप आणि सबमर्सिबल पंपांवर आता 18 टक्के टॅक्स आकारला जाणार आहे. तसेच बियाणे साफ करण्यासाठी आणि वर्गीकरण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मशीनवर 18 टक्के कर आकारण्यात येणार आहे. सोलर वॉटर हिटर्सवरही 12 टक्के GST आकारण्यात येणार आहे. याआधी पाच टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. 

आरोग्यसेवा महागणार 

रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून  अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.  त्याशिवाय, जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste ) प्रक्रिया करण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने या जीएसटी विरोधात केंद्र सरकारला पत्र लिहीले आहे. हा जीएसटी तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

शैक्षणिक वस्तू महागणार

मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे,. त्याशिवाय एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
Sanjay Raut : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल; संजय राऊतांचा दावा
'उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल'
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune : कुत्र्याच्या पिल्लाला लोखंडी राॅडने अमानुषपणे मारहाणSunetra Pawar : कन्हेरी इथल्या मारूती मंदिरातून सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटलाPM Narendra Modi : प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी मोदी नांदेडमध्येPM Narendra Modi Nanded : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नांदेडमध्ये जंगी स्वागत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
''इंडी आघाडीवाले 4 जूननंतर एकमेकांचे कपडे फाडतील, केसं ओढतील''; पंतप्रधान मोदींना 'गॅरंटी'
Sanjay Raut : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल; संजय राऊतांचा दावा
'उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत पीएम का असू शकत नाहीत? शरद पवारांचाही पाठिंबा मिळेल'
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर
'हे काही शहाणपणाचे लक्षण नाही...'; शरद पवारांचा विखे-पाटलांना टोला, अमित शहांनाही प्रत्युत्तर
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
IAS Success Story : अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
अभिनयाला राम राम करत IAS अधिकारी झाली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; अनेक सुपरहिट चित्रपट नावावर
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
सामना जिंकताच उत्साह वाढला, आकाश अंबानी ड्रेसिंग रुममध्ये पोहचला, रोहित-हर्दिकने घोषणा दिल्या!
Milind Deora : काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही; मिलिंद देवरांचे वक्तव्य
काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : मिलिंद देवरा
CSK vs LSG IPL 2024: धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
Embed widget