एक्स्प्लोर

इथेनॉल निर्मितीत शेतकरी बनणार किंग, मकेचं उत्पादन वाढवण्यावर भर, सरकारनं सुरु केला नवा प्रकल्प 

Ethanol Production : सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं उत्पादन देशात अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोलियमची आयात कमी करुन ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे.

Ethanol Production : देशात इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपायोजना करताना दिसत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात देशाचा पैसा हा इंधनाच्या आयातीवर खर्च होत आहे. त्यामुळं सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोलचं उत्पादन देशात अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पेट्रोलियमची आयात कमी करुन ते पैसे शेतकऱ्यांना देण्याची मोहीम सरकारनं सुरु केली आहे. इथेनॉलमुळे शेतकरी आता केवळ अन्नदाताच नव्हे तर ऊर्जा प्रदाता म्हणूनही ओळखले जाऊ लागला आहेत. यासाठी सरकार मकेपासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच 'इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे' हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. याची जबाबदारी ICAR अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (IIMR) देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे. 

पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल, यावर्षात ते 20 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट 

आतापर्यंत पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. तर 2025 पर्यंत ते 20 टक्क्यांवर नेले पाहिजे. त्यामुळं केवळ उसापासूनच नव्हे तर तांदूळ आणि मक्यापासून इथेनॉल बनविण्यावर सरकार भर देत आहे. ऊस आणि भात पिकामध्ये जास्त पाणी वापरले जाते, तर मक्याच्या लागवडीत कमी पाणी वापरले जाते. त्यामुळेच सरकार मकेपासून इथेनॉल बनवण्यावर भर देत आहे. म्हणूनच 'इथेनॉल उद्योगांच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढवणे' नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ज्याची जबाबदारी ICAR अंतर्गत भारतीय मका संशोधन संस्थेला (IIMR) देण्यात आली आहे. त्याअंतर्गत मक्याचे उत्पादन वाढविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप 

या प्रकल्पाची देखरेख करणारे IIMR चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस.एल. जाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, इथेनॉलसाठी मक्याचे उत्पादन वाढवण्याच्या या मोहिमेत एफपीओ, शेतकरी, डिस्टिलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र घेऊन काम केले जात आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात 1508 एकरांवर मका पेरणी करून शेतकऱ्यांना त्याची लागवड वाढवण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे, जरी वार्षिक उद्दिष्ट केवळ 1500 एकर होते.

खरीप हंगामात 788 एकर क्षेत्रात मक्याची लागवड 

सध्याच्या काळात मका लागवडीचे फायदे शेतकऱ्यांना सांगणे आणि इथेनॉलचे उत्पादन वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. सध्याच्या परिस्थितीत मका लागवडीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच चांगला नफा मिळेल. या प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात 788 एकर क्षेत्रात मक्याची लागवड करण्यात आली. ज्यामध्ये डेमोची संख्या 808 होती. या अंतर्गत 20 प्रशिक्षणे घेण्यात आली, ज्यामध्ये विविध भागातील 425 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या अंतर्गत 67 जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 1508 शेतकरी सहभागी झाले होते.

 रब्बी हंगामात 672 एकरांवर मका पेरणी

या प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामात 720 एकरांवर मका पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, तर 672 एकरांवर पेरणी झाली होती. याअंतर्गत 35 प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले, ज्यामध्ये 897 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या अंतर्गत 43 जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले, ज्यात 1500 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकल्पांतर्गत खरीप आणि रब्बी हंगामात मिळून 1508 एकर क्षेत्रामध्ये मका घेण्यात आला. इथेनॉल बनवण्यात मक्याचे योगदान वाढत असल्याचे जाट यांनी सांगितले. याच्या लागवडीमुळे निसर्गाची हानी होत नाही, त्यामुळे त्याचे उत्पादन वाढवण्यावर सरकार भर देत आहे.

इथेनॉलमध्ये मकेचे योगदान किती?

सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी इथेनॉल तयार करण्यासाठी सुमारे 60 लाख टन मकेचा वापर करण्यात आला होता. तेल विपणन कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2024-25 साठी सुमारे 837 कोटी लिटर इथेनॉलचे वाटप केले आहे. ज्यामध्ये मक्याचा सर्वाधिक वाटा 51.52 टक्के (सुमारे 431.1कोटी लिटर) आहे. केंद्र सरकार कॉर्नपासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अंतर्गत मका लागवडीला चालना दिली जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
टियर-२ शहरांतील एमएसएमई कर्जपुरवठ्याचे बदलते स्वरूप, सहकारी बँका आणि उदयोन्मुख औद्योगिक केंद्रे
Gold Silver Price Today: सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
सोने-चांदीचे दर आज स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे भाव
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Highest Dividend : कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
Embed widget