Google Search : भारतीयांनी गुगलवर 2024 मध्ये कोणत्या गोष्टी सर्च केल्या, IPL ते रतन टाटा, टॉप 10 गोष्टी कोणत्या?
Google Search Data : 2024 या वर्षातील अखेरचा महिना सुरु आहे. गुगल सर्चनं वर्षभरात भारतीयांनी काय सर्च केलं याबद्दल माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : सर्च इंजिन गुगलनं भारतीयांनी 2024 या वर्षामध्ये काय सर्च केलं याबाबतची माहिती दिली आहे. गुगलनं चित्रपट, शो, क्रिकेट मॅचेस,स्पोर्टस इवेंट, टॉप साँग, भारतीय व्यक्ती, शब्दांचे किंवा वाक्यांचे अर्थ, निअर मी, पर्यटनाची ठिकाणी, रेसेपी यासारख्या कॅटेगरीत कोणत्या गोष्टी सर्च केल्या गेल्या याची माहिती दिली. गुगलच्या आकडेवारीनुसार जगभरातील एकूण सर्चपैकी 15 टक्के सर्च नव्या विषयांशी संबंधित असतात
भारतीयांनी सर्च केलेल्या टॉप 10 गोष्टी
1. आयपीएल
2. टी 20 वर्ल्ड कप
3. भारतीय जनता पार्टी
4. निवडणूक निकाल 2024
5. ऑलिम्पिक 2024
6. वाढती उष्णता
7. रतन टाटा
8. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
9. प्रो कबड्डी लीग
10. इंडियन सुपर लीग
गुगल सर्चवर भारतात सर्वाधिक इंडियन प्रिमियर लीग सर्वाधिक सर्च करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टी 20 वर्ल्ड कपचा समावेश आहे. भारतानं टी 20 वर्ल्ड कप 17 वर्षानंतर जिंकला. त्यामुळं यासंदर्भातील सर्चचं प्रमाण वाढलं. तिसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. भाजपनं लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएचं सरकार स्थापन केलं. याशिवाय हरियाणा आणि महाराष्ट्रासारखी राज्य देखील त्यांनी निवडणुकीत जिंकली. त्यानंतर निवडणूक निकाल 2024, ऑलिम्पिक 2024, वाढती गर्मी, रतन टाटा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगचा क्रमांक लागतो.
मनोरंजन क्षेत्राचा विचार केला असता स्त्री 2 ला सर्वाधिक सर्च करण्यात आलं. कोरियन नाटकांसह नादानिया गाणं देखील सर्च करण्यात आलं.
भारतीय इंटरनेट यूजर्सनी कोणत्या व्यक्तीबाबत सर्वाधिक सर्च केलं असेल तर ते नाव विनेश फोगाट हे आहे. विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती मात्र वजन अधिक असल्यानं ती अपात्र ठरली होती. त्यानंतर हरियाणाची विधानसभा निवडणूक देखील तिनं लढवली होती. ती सध्या काँग्रेसची आमदार आहे. विनेश फोगाटनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना देखील सर्च करण्यात आलं. त्यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून ते एनडीएमध्ये परतले. लोकसभा निवडणुकीनंतर नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर भाजपचं केंद्रात सरकार आलं.
भारतीय इंटरनेट यूजर्सनी अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी गुगल सर्चची मदत घेतली. मतदान कसं करायच यापासून ते हवेची गुणवत्ता काय आहे, याचा देखील शोध गुगल सर्चद्वारे घेण्यात आला. पर्यटनासाठी कोणत्या शहरांमध्ये जावं याचा देखील शोध घेण्यात आला.
कोणत्या कॅटेगरीत सर्चमध्ये कोण टॉपवर
ओवरऑल सर्च : आयपीएल
चित्रपट : स्त्री 2
शो : हीरामंडी
टॉप साँग :नादानिया
स्पोर्टस इवेंट :आयपीएल
मॅचेस : भारत विरुद्ध इंग्लंड
व्यक्ती : विनेश फोगाट
निअर मी :एक्यूआय निअर मी
अर्थ : ऑल आयज ऑन राफाह
पर्यटन ठिकाण : अझरबैझान
इतर बातम्या :
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र