एक्स्प्लोर

गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, नेमका का घेतला निर्णय?

Google Job Cut : गुगल कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Google Job Cut : गुगल कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यवस्थापकीय पदावरील 10 टक्के  कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले जाणार आहे. यामध्ये संचालक, उपाध्यक्ष अशा मोठ्या पदांवर असलेल्या लोकांचा समावेश आहे.

या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात येणार 

सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलने गेल्या काही वर्षांत अनेक मोठे बदल केले आहेत. अशा परिस्थितीत आता कंपनी काही कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. या पदांमध्ये व्यवस्थापक, संचालक आणि उपाध्यक्ष यांचा समावेश आहे. Google च्या मते, काही पोझिशन्स वैयक्तिक कंट्रिब्युटरमध्ये बदलण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर काही पोस्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आल्या आहेत. गुगलने गेल्या दोन वर्षांत अनेक मोठी पावले उचलली आहेत. जेणेकरून कंपनी अधिक प्रभावी होऊ शकेल. यापूर्वी जानेवारी 2022 मध्ये गुगलने 12,000  कर्मचाऱ्यांना नारळ दिली होता. 

गुगलने पुन्हा एकदा नोकरकपातीचा निर्णय घेतला आहे. कारण गुगलच्या AI स्पर्धक OpenAI ने नवीन उत्पादने लाँच केली आहेत. याचा परिणाम गुगलच्या शोध व्यवसायावर होत आहे, ओपनएआय लक्षात घेऊन गुगलने त्याच्या मुख्य उत्पादनात जनरेटिव्ह एआय वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. कंपनीने काही नवीन AI उत्पादने देखील लॉन्च केली आहेत. यात नवीन AI व्हिडिओ जनरेटर आणि नवीन जेमिनी मॉडेल्सचाही समावेश आहे.

मे 2024 मध्येही गुगलने केली होती नोकरकपात

मे 2024 मध्येही गुगलने आपल्या कोअर टीममधून 200 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं होतं. कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. काही कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या इतर देशांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्या. कॅलिफोर्नियातील Google च्या अभियांत्रिकी टीममधून सुमारे 50 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा कंपनीने नोकरकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गुगलने अचानक नोकर कपातीच्या निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा दणका बसला आहे. 

टेस्लाने वर्षभरात केली मोठी नोकरकपात

टेस्लाने या वर्षी नोकऱ्या कपातीच्या दोन फेऱ्यांची घोषणा केली. सगळ्यात पहिल्यांदा 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, त्यानंतर वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या सुपरचार्जिंग टीमसह आणखी शेकडो कर्मचारी कामावरून काढून टाकले. सीईओ एलॉन मस्क यांनी काल रात्री अधिकाऱ्यांना दिलेल्या ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, उत्कृष्ट, आवश्यक आणि विश्वासार्ह चाचणी उत्तीर्ण न होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारीदेखील काढून टाकले जातील. ब्लूमबर्गने अहवाल दिला की, टेस्लाची एकूण हेडकाउंट कपात 20 टक्के किंवा 20 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचू शकते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget