एक्स्प्लोर

Good Loan vs Bad Loan :  सर्व कर्ज वाईट असतात का? चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज यातील फरक कसा ओळखावा? वाईट कर्जातून बाहेर कसं पडायचं?

Good Loan vs Bad Loan : आज कर्ज मिळणं खूप सोपं झालं आहे. कर्ज काढण्यासाठी आता बँकेत न जाता केवळ फोनवर काही मिनिटांची प्रक्रिया पूर्ण केली कर्ज मंजूर होतं. 

Good Loan vs Bad Loan नवी दिल्ली : आजकाल मोबाईल हातात घेतल्यानंतर काही मिनिटांची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होते. कर्ज मिळण्याची प्रक्रिया सोपी झाल्यानं अनेकांकडून एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घेणे किंवा मोबाईल फोन खरेदीपासून वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज मिळतंय. त्यामुळं कर्जांचं प्रमाणं वाढलं आहे. अगोदर कर्ज काढण्यासाठी बँकांमध्ये किंवा क्रेडिट सोसायटी, पतसंस्थामध्ये जावं लागायचं, कर्ज मंजूर करण्यासाठी जामीनदार द्यावे लागायचे. आता मात्र, कर्जासाठी जामीनदार देखील लागत नसल्यानं कर्ज काढणाऱ्या व्यक्तीला आणि कर्ज देणाऱ्या व्यक्तीलाच कर्जाच्या रकमेसंदर्भातील गोष्टी माहिती असतात. त्यामुळं कर्जाच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी सर्वांना कर्जासंदर्भात काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. 

चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज नेमकं कसं ओळखायचं?

रिच डॅडच्या फ्रीडम फ्रॉम बॅड डेब्ट या पुस्तकात वाईट कर्जापासून कशी मुक्तता मिळवायची यासंदर्भात विवेचन केलं आहे. काही जण म्हणतात की सर्व प्रकारची कर्ज वाईट असतात मात्र रिच डॅडच्या या पुस्तकानुसार काही कर्ज चांगली असतात तर काही कर्ज वाईट असतात. 

चांगलं कर्ज तुमच्या खात्यात पैसे जमा करत, ते तुम्हाला श्रीमंत बनवतं. तर, वाईट कर्ज तुमच्या खात्यातून पैसे काढून घेतं आणि तुम्हाला गरीब करतं. या संदर्भातील उदाहरण देऊन तुम्हाला सांगायचं तर चांगलं कर्ज म्हणजे तुम्ही कर्ज काढून घेत एखादी मालमत्ता घेऊन ती भाड्यानं दिली असेल आणि  भाडे म्हणून मिळणाऱ्या पैशांतून तुम्ही कर्जाचे हप्ते भरु शकाल आणि  तुमचा खर्च देखील भागवू शकाल.  वाईट कर्ज असं असतं ज्यातून तुमच्या खात्यातून कर्जाची परतफेड करण्यासाठी रक्कम भरावी लागते. 

वाईट कर्जातून बाहेर पडण्यासाठी प्रथम तुम्ही तुमच्यासाठी काही रक्कम ठेवा. पहिल्यांदा ती रक्कम इतर देण्यांसाठी वापरु नका. ती तुमच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा करा.  तुमच्याकडून होणारे अनावश्यक खर्च टाळा. तुमचं कर्ज वाईट कर्ज याप्रकारात मोडत असेल तर नव्यानं कसलंच कर्ज घेऊ नका. पहिल्यांदा तुमचं आर्थिक गणित बसवा.  आर्थिक स्थिती नियंत्रणात आल्यानंतर इतर विचार करा.   

वाईट कर्जातून बाहेर यायचं असल्यास तुम्ही स्वत:ला सत्य सांगा आणि वास्तवाचा सामना करा. आपल्यावर किती कर्ज आहे आणि किती परतफेड करायची आहे. तुम्ही वाईट कर्ज घेणं थांबवा. तुमच्यावर असलेल्या कर्जांची यादी करा आणि ती लिहून काढा.यामध्ये सर्व कर्जांचा उल्लेख करा. 

तुमच्या सर्व कर्जांची यादी करा, ज्या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी कमी राहिलेला असेल त्यानुसार त्या कर्जांची परतफेड करा. यानुसार तुमच्यावरील कर्जांची संख्या कमी होतेय ते तुम्ही पाहू शकता. तुम्ही तुमच्या नियमित कमाईसह उत्पन्नाचे आणखी काही मार्ग शोधा. त्यातून तुम्हाला अधिकची काही रक्कम मिळेल. सर्व कर्जांची परतफेड झाल्यानंतर तुम्ही दरमहा ती रक्कम गुंतवणूक म्हणून वापरु शकता. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
Embed widget