एक्स्प्लोर

Home Loan : 50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे? जाणून घ्या फॉर्म्युला

Home Loan: मुंबई पुण्यासह विविध शहरांमध्ये घरं खरेदी करायची असल्यास गृहकर्ज काढावं लागतं. गृहकर्जाचा कालावधी 15 ते 20 वर्षांच्या दरम्यान असल्यानं व्याज मोठ्या प्रमाणावर भरावं लागतं.

Home Loan  मुंबई : आजकाल प्रत्येकाला स्वत: चं छोटं का असेना स्वत:  चं घर असावं असं वाटतं. मात्र, घरांच्या किमती 40 ते 50 लाखांपासून पुढे कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्यानं घर खरेदी करताना बँकांकडून गृहकर्ज काढावं लागतं. आरबीआयनं रेपो रेट 5.25 टक्के ठेवल्यानं गृह कर्जांचे व्याज दर 7.10 टक्क्यांपासून सुरु होतात. मात्र, गृहकर्ज घेतल्यानंतर बँकेच्या नियमाप्रमाणं परतफेड करण्याचा विचार केल्यास जवळपास दुप्पट रकमेची परतफेड करावी लागते. गृहकर्जाची परतफेड करताना एक फॉर्म्युला वापरल्यास मोठ्या रकमेची बचत होऊ शकते. 

सीए नितीन कौशिक यांचा फॉर्म्युला नेमका काय?

गृहकर्जाची परतफेड करताना व्याजापोटी भरावी लागणारी अतिरिक्त रक्कम कशी वाचवायची यासंदर्भात सीए नितीन कौशिक यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या उदाहरणात गृहकर्जाची रक्कम 50 लाख आणि व्याजाचा दर 8 टक्के आणि कर्ज कालावधी 20 वर्ष ठेवला आहे. 

नितीन कौशिक यांच्या उदाहरणानुसार समजा तुम्ही 50 लाखांचं गृहकर्ज 8 टक्के व्याजावर 20 वर्षांसाठी घेतलं तर तुम्हाला दरमहा 41800 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. प्रामाणिक कर्ज परतफेड करणारा बँकेचा ग्राहक म्हणून तुम्ही जर 20 वर्ष कर्ज परतफेड करायला गेलात तर तुम्हाला 50 लाखांचं मुद्दल आणि व्याज 48 लाख रुपये असं एकूण 98 लाख रुपये बँकेला द्यावे लागतील.

बँकेला द्याव्या लागणाऱ्या व्याजातील 13 लाख रुपये वाचवण्यासाठी सीए नितीन कौशिक यांच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला मुद्दल कमी करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. व्याज नेहमी मुद्दलावर आकारलं जातं, त्यामुळं मुद्दल कमी करण्याकडे लक्ष द्यावं  यामुळं भविष्यातील ईएमआयमधून व्याजाची रक्कम कमी होईल.

सीए नितीन कौशिक यांच्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या तीन वर्षात दरवर्षी 1 हप्ता अधिक भरावा. यामुळं कर्जाचा कालावधी कमी होईल, चौथ्या वर्षी अडीच लाख रुपयांची रक्कम मुद्दलात जमा करा.  पुढील 5 ते 10 वर्षाच्या कालावधीत 2-3 ईएमआय अतिरिक्त भरा. दहाव्या वर्षी 1 लाखांची रक्कम थेट मुद्दलात जमा करा. यामुळं तुमचं कर्ज साडेबारा वर्षात पूर्ण संपेल. या कालावधीमध्ये तुम्हाला 50 लाखांवर 35 लाख रुपये व्याज द्यावं लागेल. यामुळं तुमचे 13 लाख रुपये वाचतील. आणि साडे सात वर्ष आर्थिक दृष्ट्या स्वंतत्र व्हालं.

आरबीआयच्या सूचनांनुसार फ्लोटिंग रेटवरील गृहकर्ज घेतलं असल्यास प्रीपेमेंटवर शुल्क किंवा दंड आकारला जात नाही. तुम्ही बँकेला प्रीपेमेंटची रक्कम कर्ज कालावधी कमी करण्यासाठी भरावी, ईएमआय कमी करण्यासाठी नव्हे असं बँकेला सांगावं.

तुम्ही तुमच्या कर्जाच्या पहिल्या पाच वर्षात  जो  1 रुपया अतिरिक्त भराल तो भविष्यात तुमचे 3-4 रुपये वाचवेल. प्रत्येक 6 महिन्यानंतर तुमच्या गृहकर्जात 5000 ते 10000 रुपयांची रक्कम जमा करावी. 

गृहकर्ज परतफेड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

गृहकर्जाचा हप्ता तुमच्या दरमहा उत्पन्नाच्या 35-40 टक्क्यांपेक्षा कमी असावा. दरवर्षी 1 ते 3 ईएमआय अतिरिक्त भरा. बोनस आणि इनक्रिमेंट म्हणून मिळालेली रक्कम मु्द्दलात जमा करा. कर्जकालावधी कमी करा, ईएमआय नव्हे. कर्जाची शिल्लक रक्कम दरवर्षी पाहा.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
वाशिम जिल्ह्यात डिझेलची टंचाई, डिझेल मिळवण्याच्या कारणावरुन ग्राहकांची तुंबळ हाणामारी 
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
SIP तून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय दक्षता घ्यावी? नुकसान टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता
Pune MNS Morcha Against Fuel Price Hike : इंधन दरवाढीविरोधात मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा | ABP Majha
Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
'शक्तिपीठ माढा तालुक्यातून पालखी व पुणे-सोलापूर महामार्गाला समांतर, एक इंचही जमीन देणार नाही'; राजू शेट्टींच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या कारचा अपघात; हायवाच्या ट्रकच्या भीषण धडकेत 1 ठार, 5 जखमी
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
व्हेनेझुएला, इराणनंतर आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला; सरकारने देशातील नागरिकांना गनिमी काव्याचे धडे देण्यास सुुरुवात केली
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
पेट्रोल 120 ते 130 रुपयांवर जाईल, जयंत पाटलांनी सांगितलं कधी महागणार; देवेंद्र फडणवीसांवरही टीका
Ladki Bahin Yojana : एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
एप्रिल महिन्याचे 1500 रुपये किती लाडक्या बहिणींना मिळाले? पात्र महिलांसाठी शेवटचा एक पर्याय, जाणून घ्या
Rajinikanth: 'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
'मला खूप आश्चर्य वाटलं', विजय सीएम होताच चक्क सुपरस्टार रजनीकांतवर खुलासा करण्याची वेळ! स्टॅलिन भेटीवरूनही थेट भाष्य, नेमकं असं घडलं तरी काय?
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
ATM मशिन गंडलं, 100 ऐवजी 500 रु, 400 ऐवजी देतंय 2000 रुपये; ग्राहकाने व्हिडिओ बनवून दाखवला
Embed widget