एक्स्प्लोर

Gold Silver Rate : चांदीचे दर 85000 रुपयांनी कोसळले, सोनं 25 हजार रुपयांनी स्वस्त, एमसीक्सवर दर कशामुळं घसरले? प्रमुख कारणं समोर

Gold Sliver Rate : सोने आणि चांदीच्या दरानं गुरुवारी उच्चांक गाठल्यानंतर शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्सवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीय.

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरातील तेजीला मोठा ब्रेक लागला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 तासात चांदीच्या दरात 85 हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या दरात 25 हजार रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलं. एमसीएक्सवर काल चांदीच्या वायद्याचे दर 420000  च्या उच्चांकावर  पोहोचले होते. 24 तासात चांदीचे दर 85000 रुपयांनी कोसळले आहेत. 
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गुरुवारी चांदीच्या दरानं 420000 चा उच्चांक गाठला होता. तर, सोन्याचे दर 2 लाखांच्या जवळ पोहोचले होते. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता 1 किलो चांदीच्या वायद्याचे दर 335001 रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी चांदीनं 420048 रुपयांचा उच्चांक गाठला होता. म्हणजेच 24 तासात चांदीचे दर 85000 रुपयांनी कमी झाले. 

सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या  वायद्याचे दर 193096 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले होते. त्यात 24 तासात 25500 रुपयांची घसरण झाली आहे. 

सोने आणि चांदीच्या दरात घसरण का? 

सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण गुंतवणूकदारांकडून करण्यात आलेली नफा वसुली हे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी सुरु होती. दररोज नवे विक्रम निर्माण होत होते. चांदीचे दर 3 लाखांहून 4 लाखांपर्यंत विक्रमी वेगानं वाढले होते.  सोन्याच्या दरात देखील तेजी आली होती, यावेळीच गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्याचा मार्ग निवडल्यानं सोने आणि चांदीचे दर घसरले. 

काही तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीमध्ये विक्री वाढली तशी काही शॉर्ट सेलर्सलनं एंट्री केली आणि ट्रेडिंग दरम्यान चांदीला शॉर्ट केलं. यामुळं चांदीच्या दरात घसरण झाली. 

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी आणि धातूंच्या दरात घसरण पाहायला मिळाली. यामुळं मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम पाहायला मिळाला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांच्या जागी पसंतीच्या व्यक्तीची निवड करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ज्यामुळं डॉलर मजबूत झाला असून याशिवाय काही ठिकाणी जागतिक तणाव कमी झाला आहे. 

सोने आणि चांदीतील घसरणीमुळं सिल्वर आणि गोल्ड ईटीएफच्या दरात मोठी घसरण झाली. शेअर बाजार बंद होईपर्यंत सिल्वर आणि गोल्ड ईटीएफमध्ये  20 टक्क्यांची घसरण झाली. 

सराफा बाजारातील सोन्याचे दर

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून सोन्याचे दर जाहीर केले जातात. आयबीजेएच्या रेटनुसार 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 165800 रुपये आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचे दर 161820 रुपये आहेत. 20 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर  147560 रुपयांवर पोहोचला आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 134290 रुपयांवर आहे. 14 कॅरेट सोन्याच्या दरानं देखील एक लाखांचा टप्पा पार केला आहे. एका तोळ्याचे दर 106940 रुपयांवर पोहोचले आहेत. हे दर जीएसटीशिवायचे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget