Gold Silver Price : चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ तर सोन्याच्या भावात 120 रुपयांची घसरण
Gold Silver Price : मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,760 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,400 रुपये इतका आहे.
मुंबई : शुक्रवारी बाजार बंद होताना चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ झाल्याचं पहायला मिळाली तर सोन्याच्या भावात 120 रुपयांची घसरण झाली आहे. आज शनिवारी, मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,760 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 72,400 रुपये इतका आहे.
गेल्या 10 दिवसांचा विचार सोन्याचे भाव हे किरकोळ स्वरुपातत बदलत आहेत. 2 जून रोजी सोन्याचा भाव हा 49,230 रुपये इतका होता. . त्यानंतर सोन्याच्या भावात कमी अधिक चढ-उतार पहायला मिळाली. 10 जून रोजी सोन्याच्या भावात 200 रुपयांची वाढ झाली तर 11 जून रोजी 120 रुपयांची घसरण झाली.
शुक्रवारी चांदीचा दर हा 71,400 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 1000 रुपयांची वाढ झाली असून ती किंमत 72,400 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 2 जून रोजी चांदीचा भाव हा 71,900 रुपये इतका होता. नंतर त्यामध्ये कमी अधिक चढ उतार होत राहिली. शुक्रवारी चांदीच्या भावात 1000 रुपयांची वाढ झाली.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास नऊ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra HSC Exam : बारावीच्या परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार : वर्षा गायकवाड
- कोरोना रुग्ण, मृत्यू संख्येबाबत कोणतीही लपवाछपवी नाही; जाणून घ्या नेमकी कशी संकलित केली जाते माहिती
- Maharashtra Corona Cases : सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन कोरोनाबाधित जास्त, 8,104 डिस्चार्ज तर 11,766 नवे रुग्ण