(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Silver Price Today : चांदीला झळाळी; चांदी 1100 रुपयांनी वधारली तर सोने 'जैसे थे'
Gold Silver Price : सोन्याच्या तुलनेत चांदीच्या भावात अधिक चढ-उतार पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कमी झालेल्या गुंतवणुकीमुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होताना दिसत आहे.
मुंबई : सातत्याने चढ-उतार सुरु असलेल्या चांदीच्या भावाने पुन्हा उचल खाल्ली असून बुधवारी बाजार बंद होताना चांदीच्या दरात 1100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा एक किलो चांदीचा भाव हा 68,700 रुपये इतका झाला आहे. तर सोन्याच्या भावात केवळ दहा रुपयांची घसरण झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,730 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 45,730 रुपये इतका आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचा भाव हा सर्वाधिक कमी आहे.
चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीचा दर सर्वाधिक असून त्या शहरांत एक किलो चांदीसाठी आता 74,100 रुपये मोजावे लागतात. त्या तुलनेत मुंबईमध्ये हा दर कमी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात सर्वाधिक कमी किंमत आल्याचं पहायला मिळतंय.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास अकरा हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Update : देशात सलग चौथ्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू
- Maharashtra Krushi Day : राज्यात आज साजरा केला जातोय कृषी दिन, जाणून घ्या त्याचं महत्व आणि इतिहास
- समुद्रात फेकला जाणाऱ्या कचऱ्या संदर्भात हायकोर्टात सुमोटो याचिका; मनपा, राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश