Gold Silver Price Today : सोनं 180 रुपये तर चांदी 300 रुपयांनी महाग; जाणून घ्या आजचा दर
Gold Silver Price Today : मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,890 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,890 रुपये इतका आहे.
मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात आज किरकोळ चढ-उतार झाल्याचं पहायला मिळालं. सोन्याच्या दरात 180 रुपये तर चांदीच्या दरात 300 रुपयांची वाढ झाली. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,890 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,890 रुपये इतका आहे. तर एक किलो चांदीसाठी आज 69,400 इतका भाव आहे.
गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात काही किरकोळ बदल होताना दिसत आहेत. चांदीच्या दराचा विचार करता 7 जुलैला 600 रुपये, 8 जुलैला 1000 रुपये आणि 9 जुलैला 200 रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाली होती. तीन दिवसांच्या घसरणीनंतर 11 जुलैला पुन्हा 500 रुपयांची वाढ झाली होती. 12 जुलैला 200 रुपयांची घट तर काल, 13 जुलैला 300 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून आलं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यामध्ये आता जवळपास आठ हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा सोन्याच्या दरावर चांगलाच परिणाम झाल्याचं दिसून आलंय.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
महत्वाच्या बातम्या :