एक्स्प्लोर

मोठी बातमी: बजेटनंतर एकाच दिवसात सोने 5800 रुपयांनी घसरले, चांदीचा भाव गडगडला; 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?

Gold Silver Price today:जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातही दर घसरले आहेत.

Gold Silver Rate Today: बजेटनंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार सुरू आहेत.  केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दरात किमतींमध्ये बदल  होईल असा अंदाज असताना सलग तिसऱ्या दिवशी सोनं तब्बल 5800 रुपयांनी घसरलं आहे. तर चांदीच्या किमती कालच्या तुलनेत 23 हजार 980 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या किमती जवळजवळ 4 टक्क्यांनी घसरल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरांवर काहीतरी परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता . मात्र अर्थसंकल्पात सोने व चांदी संबंधित कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र तरीही जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम स्थानिक सराफा बाजारांवर स्पष्टपणे जाणवत आहे. जागतिक बाजारात सोन्या चांदीच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातही दर घसरले आहेत . (Gold Silver Price today)

सोन्या चांदीचे दर किती ?

बुलियनस असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचे कालचे दर ( 1 फेब्रुवारी 2026) हे 1 लाख 48 हजार 240 रुपये होते. हा दर आज एक लाख 42 हजार 350 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढा झाला आहे. एका दिवसात सोन्याच्या किमतींमध्ये 5890 रुपयांचा फरक झाला आहे. सोन्याच्या किमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे . मात्र गेल्या काही दिवसांचा सोने खरेदीचा ट्रेंड पाहता गुंतवणूकदारांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. 

देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या दरात प्रचंड वाढ झालेली दिसली. आठवडाभरापूर्वी चांदीच्या दराने 330000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. काल (1 फेब्रुवारी ) चांदीचा किलोमागे असणाऱ्या दर 2 लाख 66 हजार 500  रुपयांवर होता. सध्या किलोमागे चांदीची किंमत 2 लाख 42 हजार 520 रुपयांवर गेली आहे. एका दिवसात चांदीच्या दरात 23 हजार 980 रुपयांची घसरण झाली आहे.


मोठी बातमी: बजेटनंतर एकाच दिवसात सोने 5800 रुपयांनी घसरले, चांदीचा भाव गडगडला; 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?

काय आहेत सोन्या चांदीच्या घसरणीचे कारणे ?

गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. अनुभवी गुंतवणूकदारांनाही या चढ - उतारांनी फसवलं. जागतिक तणाव, कमकुवत होत चाललेली चलने आणि अमेरिकन फेडरल रिजर्वच्या स्वातंत्र्याबद्दलच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सोने-चांदीकडे पाहिले. यामुळे सोन्या चांदीच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे . जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे देशांतर्गत बाजारातही दर घसरले आहेत. काही तज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प फेड चेअर म्हणून केविन वॉर्श यांना नेमण्याची योजना आखत आहेत. या बातमीनंतर डॉलर मजबूत होत असल्याची चर्चा आहे. याचा परिणाम सोन्या चांदीच्या ट्रेडवरही झालेला दिसतोय.

सुवर्णनगरीत ग्राहकांना दिलासा

काल 1,58,000  वर असलेले सोन्याचे दर हे जीएसटीशिवाय 151000 वर खाली आले असून एकाच दिवसात सात हजार रुपयांची घसरण झाल्याचं दिसून येत आहे. चांदीच्या दरात ही 10 हजार रुपयांची घसरण होऊन,काल 270000  रुपयावर असलेले चांदीचे दर हे 260000 इतक्या खाली आल्याने,सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाला असला,तरी वाढत्या दरात सोने आणि चांदी खरेदी केलेल्या गुंतवणूक दारांना मात्र मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget