Gold Silver Price Today : सोन्याच्या दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या तुमच्या भागातील दर
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून सोने पुन्हा एकदा 50,000 च्या जवळपास पोहोचले आहे तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
Gold Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आज सोन्याचे दर पुन्हा 50 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आजही सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे.
MCX वर सोन्याचे भाव काय आहेत
सोन्याचा दर 400 रुपयांपेक्षा जास्त उसळी घेऊन व्यवहार करत आहे. एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या एप्रिल डिलिव्हरीसाठी 49,500 चा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी MCX वर, सोने 402 रुपये किंवा 0.82 टक्के प्रति 10 ग्रॅम वाढीसह व्यवहार करत आहे. सोन्याच्या दराने आज 49,516 हजारांचा उच्चांक गाठला आहे.
चांदीच्या दरात कमालीची वाढ
आज चांदीमध्ये 1.14 टक्क्यांची जबरदस्त वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सवर सिल्व्हर मार्च फ्युचर्स 715 रुपये प्रति किलोच्या उसळीसह व्यवहार करत आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर मार्च फ्युचर्स 63,703 रुपये प्रति किलो पातळीवर व्यवहार करत आहे.
जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किमती जाणून घ्या,
कॉमेक्सवर सोन्याची किंमत $1.15 किंवा 0.66 टक्के वाढीसह $1,854.25 प्रति औंसवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीमध्येही वाढ होऊन व्यवसाय होत आहे. कॉमेक्सवर 1 टक्क्यांच्या वाढीसह चांदी 23.602 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किमतीत वाढ
डॉलरच्या घसरणीमुळे यावेळी तुलनात्मक घसरण दिसून येत आहे. याशिवाय जागतिक पातळीवरील अस्थिरता पाहता सध्या सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात असून जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती वाढत आहेत.
अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता :
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची आहे. तर यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- PAN Card : अल्पवयीन मुलाचे पॅनकार्ड बनवायचे आहे! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
- Share Market Updates : शेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला
- SBI on ABG Shipyard issue : एबीजी शिपयार्डविरुद्ध तक्रारी दाखल करण्यास विलंब नाही, एसबीआयचं स्पष्टीकरण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha