Gold Rate Today : लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ सुरुच; चांदीचे दरही महागले
Gold Rate Today : मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एक किलो चांदीचा दर 67,430 रूपये आहे.
![Gold Rate Today : लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ सुरुच; चांदीचे दरही महागले gold rate today gold and silver price in on 9th december 2022 gold and silver rate hike today marathi news Gold Rate Today : लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ सुरुच; चांदीचे दरही महागले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/09/79f4de24e0acb8b095ff3ec8dd9e0f2d1670564016484358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय बाजारात आज म्हणजेच, शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या मुहूर्तावर ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागतोय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचा दर सुरुवातीच्या व्यवहारात 0.14 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, बाजारात आज चांदी (Silver Price Today) 0.68 टक्क्यांनी वाढली आहे. आज एक किलो चांदीचा दर 67,430 रूपयांवर व्यवहार करत आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,210
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,693
1 किलो चांदीचा दर - 67,430
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,210
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,693
1 किलो चांदीचा दर - 67,430
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,210
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,693
1 किलो चांदीचा दर - 67,430
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,210
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,693
1 किलो चांदीचा दर - 67,430
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,110
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,601
1 किलो चांदीचा दर - 67,320
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,130
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,619
1 किलो चांदीचा दर - 67,340
जागतिक बाजारातील सोन्या-चांदीचे दर :
आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोन्या-चांदीचे भाव तेजीत आहेत. शुक्रवारी सोन्याची स्पॉट किंमत 0.71 टक्क्यांनी वाढून $1,793.79 प्रति औंस झाली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतही आज 2.36 टक्क्यांनी वाढून 23.26 डॉलर प्रति औंस झाली आहे. गेल्या एका महिन्यात सोन्याच्या किमतीत 4.79 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही 30 दिवसांत 8.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सोनं खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता कशी तपासावी? (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीवर भर, बँक निफ्टीने गाठला उच्चांक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)