Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचे दर
Gold Rate Today : गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 48,980 रूपये आहे.

Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. परंत, आज गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेटचा दर 53,580 रूपयांवर व्यवहार करत आहे. मागच्या दोन दिवसांच्या तुलनेत आजच्या दरात किंचित घट झाली आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 66,600 रूपये झाला आहे. त्यामुळे लग्नसराईच्या हंगामात ग्राहकांना सोने खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर काय आहेत.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर :
| शहर | दर |
| मुंबई | 48,980 |
| पुणे | 49,030 |
| नागपूर | 49,030 |
| नाशिक | 49,030 |
| दिल्ली | 48,990 |
| कोलकाता | 48,980 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Share Market Updates : शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्समध्ये 600 अंकाची घसरण
- Crude Oil Import : भारताचा तेल आयातीवरील खर्च दुप्पट; कच्च्या तेलाच्या आयातीसाठी 'इतके' अब्ज डॉलर खर्च
- Car : भारतातील ऑटो बाजारपेठेतून आणखी एका ब्रॅण्डची एक्झिट
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या





















