(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : सोन्याचे दर 50 हजारांच्या पार; तर चांदीही महागली, काय आहेत आजचे दर?
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 40,040 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : दसरा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने ग्राहक सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करतात. मात्र, ग्राहकांसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा आजचा दिवस उत्तम नाही. कारण, सोन्याच्या दराने आज 50,000 आकडा पार केला आहे. फेडरल रिझर्व्हच्या गुरुवारी बेंचमार्क व्याजदर वाढविण्याच्या निर्णयानंतर अमेरिकन डॉलरच्या किंमतीत वाढ झाली आहे. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही झाला आहे. यूएस फेड रिझर्व्हच्या (US Federal Reserve) घोषणेनंतर यूएस डॉलर निर्देशांक 20 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी घसरून 24 कॅरेट सोन्याचा दर 40,040 रूपयांवर आला आहे. तर, चांदीचे दर देखील 500 रूपयांनी वाढले आहेत. आज एक किलो चांदीचा दर 57,790 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 45,870 | 57,790 |
पुणे | 45,888 | 57,880 |
नाशिक | 45,888 | 57,880 |
नागपूर | 45,888 | 57,888 |
दिल्ली | 45,806 | 57,790 |
कोलकाता | 45,824 | 57,810 |
आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात, डॉलर निर्देशांक 0.1 टक्क्यांनी घसरल्याने सोन्याचे भाव सपाट होते. परंतु, यूएस मध्यवर्ती बँकेने केलेल्या 75-बेसिस-पॉइंट दर वाढीमुळे गुरुवारी तो त्याच्या 20 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. स्पॉट गोल्ड 0107 GMT पर्यंत $1,671.60 प्रति औंस वर होते. US सोने फ्युचर्स दर 0.1 टक्क्यांनी वाढून $1,682.80 वर पोहोचले आहेत.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
ग्राहक आता घरी बसूनसुद्धा आजचे सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याची किंमत तपासू शकता. मात्र, लक्षात ठेवा तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्वाच्या बातम्या :