(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,560 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : भारतीय बाजारपेठेत मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या (Gold-Silver Rate) किंमतीत चढ-उतार पाहायला मिळतायत. कालच्या तुलनेत पाहिल्यास आज सोन्या-चांदीच्या दरात काहीसा फरक दिसून आलेला नाही. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,560 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 59,420 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 48,180 | 59,420 |
पुणे | 48,180 | 59,420 |
नाशिक | 48,180 | 59,420 |
नागपूर | 48,180 | 59,420 |
दिल्ली | 48,098 | 59,320 |
कोलकाता | 48,116 | 59,340 |
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात? जाणून घ्या आजचे दर
- Share Market : शेअर बाजार काही अंशांनी वधारला, Sensex 130 अंकांनी वधारला, ऑईल अॅन्ड गॅसच्या शेअर्समध्ये 2.5 टक्क्यांची वाढ
- अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल, आता आयकर भरणारे या योजनेत सहभागी होऊ शकणार नाही