Gold Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरुच; काय आहेत 22 कॅरेट सोन्याचे दर?
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,400 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर कमी-जास्त होत असतात. याचाच परिणाम भारतीय बाजारपेठेवरही दिसून येतो. नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. या दरम्यान लग्न मुहूर्ताला सुरुवात होते. मात्र, बाजारात सोन्या-चांदीचे दर (Gold-Silver Rate) दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,400 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,500 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 48,033 | 62,500 |
पुणे | 48,052 | 62,560 |
नाशिक | 48,052 | 62,560 |
नागपूर | 48,052 | 62,560 |
दिल्ली | 47,951 | 62,440 |
कोलकाता | 47,969 | 62,470 |
जागतिक बाजारातील दर :
स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजीची लाट, सेन्सेक्सची 1000 अंकांची उसळी