Gold Silver Price : सोन्याचे दर घसरले, चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या दर
Gold Sliver Price : वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले.
Gold Sliver Price : शुक्रवारी वायदे बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट झाल्याची दिसून आली. एमसीएक्स एक्सचेंजवर सोन्याच्या दरात 162 रुपयांची घसरण झाली. सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 51915 ट्रे़ड करत आहे. त्याशिवाय, जागतिक बाजारात वायदे बाजारातही सोन्याचा दर घसरला. तर, देशांतर्गत सराफा बाजारात सकाळी चांदीच्या किंमतीत (Silver Price) घट झाल्याची दिसून आली.
शुक्रवारी वायदे बाजारात सोन्यासह चांदीच्या दरात घसरण दिसून आली. चांदीसाठी प्रति किलो 70 हजार रुपयांपेक्षा कमी दर सुरू होता. एमसीएक्सवर (MCX) पाच मे 2022 साठीच्या चांदीचा दर 130 रुपयांच्या घसरणीसह 69190 किलोवर ट्रेड सुरू होता.
सोन्याचा दर
जागतिक पातळीवर वायदे बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. ब्लमूबर्गने दिलेल्या माहितीनुसार, वायदे बाजारात कॉमेक्सवर शुक्रवारी सकाळी 0.13 टक्के अर्थात 2.60 डॉलरच्या घसरणीसह 1965.10 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता.
चांदीचा जागतिक दर
वायदे बाजारात चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. शुक्रवारी सकाळी चांदीचा जागतिक वायदे बाजारातील दर कॉमेक्सवर 0.06 टक्क्यांच्या घसरणीसह 25.91 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता.
क्रूड ऑइल
आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलचे दर वधारले. शुक्रवारी सकाळी ब्रेंट क्रूड 0.18 टक्क्यांनी वधारला. ब्रेंट क्रूड ऑइलचा दर 119.24 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड सुरू होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Fuel Price Hike : ...तर, रिलायन्सच्या पेट्रोल पंपला पुन्हा टाळं लागणार, जाणून घ्या कारण
- Explainer : शेल कंपन्यांसाठी कोलकाता 'नंदनवन'; असा होतो काळा पैसा पांढरा
- Indian Railway IRCTC : रेल्वेचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय, 2 एप्रिलपासून सुरू होणार 'ही' सेवा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha