Gold Rate Price Today : सोने खरेदीची सुवर्णसंधी, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर
Gold Rate Price Today : सोन्या- चांदीच्या बाबतीत आज फारसा बदल दिसून आला नाही. आजच्या व्यवहारात सोने 47,925 प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. तर, चांदी 0.22 वाढत्या किंमतीसह 63,160 रूपयांच्या दरावर आहे.
Gold Rate Price Today : जर तुम्हाला सोन्याच चांदीची खरेदी (Gold-Silver Price) करायची आहे. तर आजच सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. याचं कारण असं की, मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सलग चढ-उतार सुरू आहेत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात कोणतीच वाढ दिसून आली नाही. तर, चांदीच्या दरात आज भरपूर वाढ झालेली दिसत आहे.
जाणून घ्या आजचे सोन्या चांदीचे दर
आज सोन्याच्या दरात कोणताच बदल दिसून आला नाही. सोन्याची किंमत आजच्या दरात 48 हजाराच्या जवळपास आहे. आजच्या व्यवहारात सोने 47,925 प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. सोन्याच्या दरात जरी बदल झाला नसला तरी चांदीच्या दरात मात्र बरीच वाढ झालेली आहे. चांदी 0.22 च्या वाढीसह 63,160 रूपये किलोंच्या दरात आहे.
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर
तुम्ही या दरांनी फार सोप्या पद्धतीने घरबसल्या जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जो मेसेज येईल त्यामधून तुम्ही सोन्या-चांदीचे आजचे दर जाणू शकता.
अशा पद्धतीने चेक करू शकता सोन्याची शुद्धता
जर तुम्हाला सोन्याची शुद्धता चेक करायची आहे. तर यासाठी सरकारतर्फे एका अॅपची सुविधा करण्यात आली आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून तुम्ही सोन्याची (Gold) शुद्धता (Purity) चेक करू शकता. इतकेच नाही, तर या अॅपच्या माध्यमातून तुम्ही संबंधित कोणतीही तक्रारदेखील नोंदवू शकता.
महत्वाच्या बातम्या :
- ब्रिटनच्या न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका, लंडनच्या घरातून बाहेर काढण्याचे आदेश
- ओमायक्रॉन डेल्टा व्हेरियंटविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवेल, पण यासाठी 'ही' गोष्ट करणं महत्त्वाचं- WHO
- Fixed Deposit : करमुक्त मुदत ठेवींचा कालावधी पाच वरून तीन वर्षे करावा ; बँकांची सरकारकडे मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)