एक्स्प्लोर

Gold silver Price: सोन्याच्या भावात 13 हजार रुपयांची तर चांदीत 32 हजार 700 रुपयांची घसरण, सोनं-चांदी स्वस्त, खरेदीसाठी सुवर्णसंधी?

Gold silver Price: एका आठवड्यात सोन्याच्या भावात १३,७०० रुपयांची तर चांदीत ३२,७०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली: जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि इराण-इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम सोने चांदीच्या बाजारावर दिसून येत आहे. गेल्या अवघ्या एका आठवड्यात सोने आणि चांदीच्या (Gold silver Price) दरात मोठी पडझड झाली आहे. सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १३,७०० रुपयांनी उतरले आहेत, तर चांदीच्या दरात प्रति किलो ३२,७०० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.(Gold silver Price)

आकडेवारी काय सांगते?

अवघ्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत ८.४७% आणि चांदीच्या किमतीत १२.४०% घट झाली आहे.
सोनं: १ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर १,७३,०९० रुपये होता, जो आता घसरून १,४५,९७० रुपयांवर आला आहे.
चांदी: महिन्याच्या सुरुवातीला चांदी ३,१५,००० रुपयांच्या उच्चांकावर होती, ती आता २,४५,००० रुपयांपर्यंत खाली आली आहे.

दर का घसरत आहेत? (मुख्य कारणे)

१. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे संकेत: अमेरिकेत व्याजदर प्रदीर्घ काळ चढे राहण्याची शक्यता आहे. जेव्हा व्याजदर जास्त असतात, तेव्हा गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात, ज्यामुळे सोन्याची मागणी कमी होते.
२. डॉलरची मजबूती: आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्यामुळे इतर देशांसाठी सोने खरेदी करणे महाग झाले आहे, परिणामी जागतिक मागणी घटली आहे.
३. चीनची भूमिका: जगातील सर्वात मोठा खरेदीदार असलेल्या चीनच्या मध्यवर्ती बँकेने (People's Bank of China) सोन्याची खरेदी थांबवली आहे. यामुळे मोठे गुंतवणूकदार आता नफावसुली (Profit Booking) करत आहेत.

तज्ज्ञांचे मत काय?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विश्लेषक मानव मोदी यांच्या मते, "भू-राजकीय तणाव आणि महागाईचा धोका यामुळे सोन्यावर दबाव आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेल्या आहेत, ज्यामुळे ऊर्जा-जनित महागाईची चिंता वाढली आहे. 'होर्मुज सामुद्रधुनी'मधील अडथळ्यांमुळे कच्च्या तेलाचे दर चार वर्षांतील उच्चांकावर आहेत."(Gold silver Price)

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

मार्केट गुरु अनिल सिंघवी यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सध्या सोन्याची मोठी खरेदी करणे टाळावे. बाजार अजून खाली जाण्याची शक्यता असल्याने स्थिर होण्याची वाट पाहावी.एकदाच मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी, येणाऱ्या काही आठवड्यात किंवा महिन्यांत हळूहळू गुंतवणूक करावी. डॉलर इंडेक्स आणि कच्च्या तेलातील चढ-उतारामुळे येणाऱ्या काळात सोने-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता राहू शकते. सध्या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असली, तरी जागतिक तणावामुळे बाजार अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांनी आणि गुंतवणूकदारांनी बाजार पूर्णपणे स्थिर होण्याची वाट पाहूनच निर्णय घेणे हिताचे ठरेल, असंही काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget