Gold Price Today: आजही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅमचे ताजे दर
Gold Price Today, 27 January 2022: सोन्याच्या किंमतीत आजही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने दरात 1.12 टक्क्यांची घसरण झालीय.
Gold Price Today, 27 January 2022: सोन्याच्या किंमतीत आजही घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने दरात 1.12 टक्क्यांची घसरण झालीय. तसेच चांदीच्या दरातही घट झालीय. ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दर 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. परंतु, आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर प्रति 10 ग्रॅम सोन्याचे दर 48 हजार 305 वर ट्रेड करीत आहे.
गुडरिटर्न वेबसाईटनुसार, दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 650 रुपये इतका आहे. चेन्नईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. कोलकाता येथील सोन्याचा भाव 48 हजार 200 रुपये आहे. तर, मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याचा दर 49 हजार 650 रुपये आहे.
सोन्याची शुद्धता कशी ओळखतात?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येतं. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असतं. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात. सोनं जितकं जास्त कॅरेटचं तितकी त्याची गुणवत्ता चांगली. त्यामुळं त्याची किंमतही वाढत जाते. हॉलमार्क असणे ही सरकारी गॅरंटी असून ग्राहकांनी सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क चिन्ह आहे का? याची तपासणी करावी आणि त्याची खरेदी करावी असं आवाहन केंद्रीय ग्राहक मंत्रालयाच्या वतीनं करण्यात आलंय.
तुम्हाला आता घरबसल्या सोन्याचे आजचे ताजे दर जाणून घेता येणार आहे. इंडियन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन सोन्याचे आजचे दर जाणून घेता येऊ शकतात.
हे देखील वाचा-
- Budget 2022 : देशाचा यंदाचा अर्थसंकल्पही डिजिटल स्वरुपात; फक्त इतक्याच प्रतींची छपाई
- Budget 2022: अर्थसंकल्पात अन्न आणि पेय उद्योगाला चालना देण्यासाठी 'ही' पाऊले उचला; TPCIची मागणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha