दिल्लीत सोन्याच्या दराने मोडले सर्व विक्रम, एप्रिल महिन्यात सोनं तब्बल 'एवढ्या' रुपयांनी महागलं
दिल्लीत सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्लीत (Delhi) मोठ्या प्रमाणात दरात वाढ झालीय. एप्रिल महिन्यात सोनं तब्बल 6,750 रुपयांनी महागलं आहे.
Gold Price News : देशात सध्या सोन्याच्या दरात (Gold Price) विक्रमी वाढ होताना दिसतेय. काही केल्या सोनं कमी होताना दिसत नाही. सोन्याच्या (Gold) दरातील ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. दरम्यान, दिल्लीत सोन्याच्या दरानं सर्व विक्रम मोडले आहेत. दिल्लीत (Delhi) मोठ्या प्रमाणात दरात वाढ झालीय. एप्रिल महिन्यात सोनं तब्बल 6,750 रुपयांनी महागलं आहे.
दिल्लीत सोन्याच्या दरानं विक्रमी पातळी गाठलीय. दिल्ली सराफा बाजारात एप्रिल महिन्यात सोन्याचे दर हे 6,750 रुपयांनी महागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेष म्हणजे देशाची राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. पुढच्या काही दिवसात सोन्याचे दर हे 75 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या देशातील वायेद बाजारात सोन्याने 73 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सोन्याची खरेदी करावी की नको? खरेदीदारांच्या मनात प्रश्न
सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या हंगामात सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, दिवसेंदिवस सोनं विक्रमी पातळी गाठत आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. कारण मोठ्या प्रमाणात झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. त्यामुळं सध्या सोनं घेणं परवडत नाही. दिल्लीत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालीय. दिल्लीत सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. पुढच्या काही दिवसात सोनं 75 हजार रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता आहे.
इराण-इस्राईलच्या युद्धाचा दरावर परिणाम
इराण-इस्राईलच्या युद्धामुळं जगभरातील वातावरण तणावात आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत आहे. कारण सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याकडं बघितलं जाते. त्यामुळं मोठ्या बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. याचा परिणाम दरावर होत असल्याचे दिसत आहे. तसेच जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे सोन्याच्या दरातही वाढ होतेय.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ
दरम्यान, सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ होताना दिसत आहे. सध्या चांदीचा भाव हा 100 रुपयांनी वाढून 86,600 रुपये प्रति किलो या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. 86,600 रुपये प्रति किलो हा सोन्याचा विक्रमी दर आहे. दरात वाढ झाल्यामुळं चांदीच्या खरेदीकडे ग्राहक पाठ फिरवताना दिसत आहेत. 31 मार्च 2024 रोजी सोन्याचा भाव 67,350 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. तर सध्या तो 74,100 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. एप्रिलमध्ये तब्बल दरात 6750 रुपयांची वाढ झालीय. तब्बल दरात 10 टक्क्यांची वाढ झालीय.