![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gold Buying Tips: सोने खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी
Gold Buying Tips for Dhanteras 2022: धनत्रयोदशीनिमित्ताने सोने खरेदी करत असताना फसवणूक टाळण्यासाठी या काही गोष्टींची काळजी घ्यावी.
![Gold Buying Tips: सोने खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी gold buying tips in dhanteras diwali follow 5 steps for avoid gold jewellery fraud Gold Buying Tips: सोने खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/d9fe1209b4c20f1d078dd2d29567da821666421916311290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Buying Tips for Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या (Dhanteras) निमित्ताने अनेकजण सोने खरेदी (Gold Buying) करतात. सोन्यातील गुंतवणुकीसह चांदी, वाहन, भांडी, घरे आदी गोष्टींमध्येही गुंतवणूक करतात. आजच्या धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी सोने खरेदी करणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यामुळे तुमची सोने खरेदी करताना फसवणूक होणार नाही.
सोने एक महत्त्वाची कमोडिटी आहे. ज्वेलरी बाजारात सोने खरेदी करताना फसवणूक होत असल्याची काहींची तक्रार असते. सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष न दिल्यास तुमचीदेखील फसवणूक होऊ शकते.
सोने खरेदी करताना हॉलमार्क पाहा
ISO (Indian Standard Organization) ने सोने खरेदी करण्यापूर्वी त्यावर असलेले हॉलमार्क तपासण्याचा सल्ला दिला आहे. हॉलमार्क हा सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण देते. त्याशिवाय, ज्वेलर्स सोन्यावर असलेले स्टॅम्पिंग आदींबाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सोन्याची किंमत तपासा
सोन्याच्या दरात चढ-उतार होत असतात. त्यामुळे दुकानात जाऊन सोने खरेदी करण्याआधी तुम्ही तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तपासून घ्या. तुम्ही सोने हे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटचे खरेदी करत आहात, याकडे लक्ष द्यावे. 24 कॅरेटचे सोने हे सगळ्यात शुद्ध आणि महाग असते. साधारणपणे ज्वेलरी 22 कॅरेट सोन्याची असते.
घडणावळ (मेकिंग चार्ज) किती?
सोने खरेदी करताना तुम्ही ज्वेलर्सच्या घडणावळ अर्थात मेकिंग चार्जकडेही लक्ष द्या. हे चार्जेस प्रत्येक स्टोअरनुसार वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही ज्या ज्वेलर्सकडून दागिने खरेदी करत आहात, तिथे बाजारातील शुल्कापेक्षा अधिक आकारणी होत नाही ना, हेदेखील पाहा.
रोखीने खरेदी टाळा
दागिने खरेदी करताना अनेकजण रोखीने व्यवहार करतात. मात्र, शक्यतो रोखीचा व्यवहार टाळावा. दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डचाही वापर करू शकता. दागिने खरेदी केल्यानंतर त्याची रिसीट न विसरता घ्यावी.
विश्वासू ज्वेलर्सकडून करा खरेदी
दागिने खरेदी करताना नेहमी चांगल्या, विश्वसनीय आणि परिचयातील दुकानातून दागिने खरेदी करा. त्यामुळे तुमची फसवणूक होण्याचा धोका कमी असतो. त्याशिवाय, तुम्ही रिझर्व्ह बँकेचे गोल्ड बॉण्ड अथवा डिजीटल गोल्डदेखील पेटीएम, गुगल पे, फोन पेच्या माध्यमातून खरेदी करू शकता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)