Gold Rate : पुणे 64,300, जळगाव 64,450, साताऱ्यात GST सह 67350 रुपये तोळा, तुमच्या शहरात सोन्याचा आजचा भाव किती?
सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे.
Gold Price : सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे. मागील तीन दिवसांपासून सोन्याचे दरात सातत्यानं वाढ होताना दिसतेय. त्यामुळं सोन्याची खरेदी करण्याचा कल कमी होताना दिसत आहे. GST सह आज सोन्याचा दर हा 66,800 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, सोन्याचे दर हे 70 हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जाणून घ्या महत्वाच्या शहरातील सोन्या चांदीचे दर
मुंबई - सोने - 67250, चांदी - 74600(+GST)
अहमदाबाद - सोने - 67300, चांदी - 74400
हैदराबाद - सोने - 67250, चांदी - 74650
चेन्नई - सोने - 67350, चांदी - 74900
सेलम - सोने - 67300, चांदी - 74700
विजयवाडा - सोने - 67000, चांदी - 74800
सातारा - सोने 67350, चांदी -74850 (+GST)
दिल्ली - सोने - 64900, चांदी - 74100
नागपूर - सोने - 64400, चांदी -74000
नाशिक - सोने - 64400, चांदी - 73900
नांदेड -सोने - 64450, चांदी - 74000
जालना - सोने - 64450, चांदी - 74000
पुणे - सोने - 64300
जयपूर - सोने - 64000, चांदी -73500
सांगली - सोने - 63950, चांदी - 73800
बंगळुरु - सोने - 63800, चांदी - 74000
जळगाव - सोने - 64,450
ग्राहकांनी सोने खरेदीकडे फिरवली पाठ
गेल्या तीन दिवसात सोन्याच्या दरात तब्बल 2800 रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर हे 66800 रुपये इतक्या विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. वाढत्या दरात सोने ग्राहकांनी मात्र सोने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र जळगाव सुवर्ण नगरीत पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक ही सोन्यामध्ये करण्यास सुरु केल्यानं, सोन्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या मागे तब्बल दोन हजार आठशे रुपयांची वाढ तीन दिवसात झाली आहे. सोन्याचे दर हे 64800 तर GST सह 66800 रुपयांच्या वर जाऊन पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या: